AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन-धोनी-रजनीकांतसारखे सेलिब्रिटी हेअरकटसाठी किती फी देतात?

हेअरस्टाइल किंवा हेअरकटमुळे एखाद्याचा लूक पूर्णपणे बदलू शकतो. बॉलिवूड, टॉलिवूड किंवा क्रिकेट क्षेत्र असो.. अनेक सेलिब्रिटी त्यांचा हेअरकट कोणाकडे करतात माहितीये का? त्यांच्या एका हेअरस्टाइलसाठी लाखो रुपये खर्च केले जातात.

| Updated on: Apr 03, 2024 | 12:34 PM
Share
स्त्री असो किंवा पुरुष.. हेअर स्टाइल आणि हेअरकटमुळे प्रत्येकाचा लूक पूर्णपणे बदलू शकतो. मोठमोठ्या सेलिब्रिटींची हेअरस्टाइल त्यांचे असंख्य चाहते फॉलो करतात. मग अशावेळी या सेलिब्रिटींची हेअरस्टाइल आणि हेअरकट अत्यंत अनोख्या पद्धतीने करण्याची जबाबदारी स्टायलिस्टवर असते.

1 / 11
हे सेलिब्रिटी त्यांचा हेअरकट कुठे करत असतील, असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. सेलिब्रिटींच्या हेअरस्टाइलसाठी किती पैसे आकारले जातात, तेसुद्धा जाणून घ्या..

2 / 11
क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील बरेच सेलिब्रिटी हे ज्या हेअर स्टायलिस्टकडे जातात, त्याचं नाव आहे आलिम हकीम. बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड.. इंडस्ट्रीतील जवळपास 98 टक्के सेलिब्रिटींची हेअर स्टायलिंग आलिम करतो.

3 / 11
'वॉर'मधील हृतिक रोशन, 'कबीर सिंह'मधील शाहिद कपूर, 'बाहुबली'मधील प्रभास, 'अॅनिमल'मधील रणबीर कपूर आणि बॉबी देओल, 'जेलर'मधील रजनीकांत यांची हेअर स्टायलिंग आलिमनेच केली आहे.

4 / 11
अजय देवगण, विराट कोहली, श्रेयस अय्यर, महेंद्र सिंह धोनी, महेश बाबू, रणवीर सिंह, रोहित शर्मा, आनंद पिरामल, अर्जुन कपूर यांसह अनेक सेलिब्रिटी आलिम हकीमचे क्लाएंट आहेत.

5 / 11
28 मार्च 1984 रोजी आलिमचे वडील हकीम कॅरानवी यांचं निधन झालं होतं. त्यावेळी आलिम 9 वर्षांचा होता. हकीम कॅरानवी हे 1960 पासून 80 पर्यंत सर्वोत्कृष्ट हेअरड्रेसर होते. त्यांनी हेअर स्टायलिंग क्षेत्राला एका नव्या उंचावर नेलं होतं.

6 / 11
वडिलांच्या निधनानंतर आलिमने वयाच्या नवव्या वर्षापासूनच काम शिकायला सुरुवात केली. शिकता शिकता वयाच्या 16 व्या वर्षापासून त्याने हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.

7 / 11
आलिमच्या वडिलांनीच अमिताभ बच्चन यांची प्रसिद्ध हेअरस्टाइल केली होती. दिलीप कुमारपासून सुनील दत्त, अनिल कपूर हे सर्वजण त्यांचे क्लाएंट होते. ब्रूस ली, मोहम्मद अली, टोनी क्रेग, रिचर्ड हॅरिस, क्रेझी बॉइज या सर्वांची हेअर स्टायलिंग आलिमच्या वडिलांनी केली होती.

8 / 11
जेव्हा आलिमने मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तो करिअरमध्ये नेमकं काय करावं या संभ्रमात होता. मात्र वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने निर्णय घेतला की वडिलांच्या हकीम ब्रँडला पुढे घेऊन जायचं.

9 / 11
आलिमने त्याच्या घराच्या बाल्कनीमध्ये पंखा, बेसिन आणि कटिंग खुर्ची लावून कामाची सुरुवात केली. आपल्या मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्याने आज मोठा हेअर ड्रेसिंग स्टुडिओ उभारला आहे.

10 / 11
आलिम हकीम एका हेअर स्टायलिंग आणि हेअरकटसाठी कमीत कमी एक लाख रुपये घेतो. हेअरस्टायलिंग आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेनुसार ही फी बदलते. कारण कोणताही लूक करायचा असेल तर त्याला अनेकदा सहा-सहा महिन्यांचा कालावधी लागतो.

11 / 11
Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...

गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती

पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार