PHOTO | घटस्फोटानंतर नवऱ्याकडून भरमसाठ पोटगी वसूल करणाऱ्या ‘या’ अभिनेत्री

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:13 PM, 19 Oct 2020
1/8
अभिनेत्री करिश्मा कपूरने पती संजय कपूरशी 2016मध्ये घटस्फोट घेतला. पोटगी म्हणून तिने संजय कपूरचे घर आणि मुलांच्या खर्चासाठी 14 करोडचे बाँड घेतले होते. यातून तिला दरमहिना 10 लाखांचे उत्पन्न मिळते. शिवाय मुलांचा सगळा खर्च संजय कपूरला करावा लागतो.
2/8
अमृता सिंहने अभिनेता सैफ अली खानसह 13 वर्ष संसार केला. मात्र, घटस्फोटानंतर तिने पोटगी म्हणून सैफची निम्मी संपत्ती मागितली होती.
3/8
18 वर्षांच्या संसारानंतर अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी घटस्फोट घेतला. यावेळी मलायकाने 10-15 करोड रुपयांची पोटगी मागितली होती. अरबाज खानने 15 कोटी देत तिला या नात्यातून मुक्त केले होते.
4/8
अभिनेता आमिर खानने किरण रावशी लग्न करण्यापूर्वी पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतला होता. यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली होती.
5/8
राणी मुखर्जीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आदित्य चोप्राने पत्नी पायल खन्नाला घटस्फोटासाठी मोठी रक्कम देऊ केली होती.
6/8
रिया पिल्लईने संजय दत्तशी नाते तोडल्यानंतर समुद्र किनाऱ्याजवळ असणारा त्याचा बंगला स्वतःच्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर तिने टेनिसपटू लिएंडर पेसशी लग्नगाठ बांधली होती. मात्र हे नाते देखील फार काळ टिकले नाही. त्याच्याशी घटस्फोट घेताना रियाने केवळ 4 लाखांची पोटगी मागितली.
7/8
अभिनेता हृतिक रोशनकडे पत्नी सुझान खानने पोटगी म्हणून जवळपास 400 करोड रुपयांची मागणी केली होती.
8/8
अधुना अख्तरने एकरकमी पोटगी घेण्यास नकार देत, महिन्याकाठी काही रक्कम तिला मिळावी अशी मागणी केली होती. फरहान अख्तरने त्याचे राहते घर तिच्या नावावर करून, तिची दुसरी मागणीदेखील मान्य केली.