अवघ्या 21 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे.
1 / 7
मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चिंचपोकळीचा चिंतामणी हे गणेशोत्सव मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरं करत आहे.
2 / 7
आज म्हणजे 11 ऑगस्टला चिंतामणीचा आगमन सोहळा आयोजित केला आहे. यंदा या चिंतामणीचं 100 वं वर्ष असल्याने लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील चिंतामणीच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.
3 / 7
चिंचपोकळीचा पूल धोकादायक घोषित केल्याने हा आगमन सोहळा लालबागच्या गणेश टॉकिजपासून सुरु होणार आहे. त्यानंतर पुढे श्रॉफ बिल्डिंगपासून, तांबावाला बिल्डींग ते चिंतामणी मंडप असा हा आगमन सोहळा असणार आहे.
4 / 7
चिंतामणीचं शतक महोत्सवी वर्ष असल्याने आगमन सोहळ्याला मुंबईकर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
5 / 7
दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत चिंतामणीचं आगमन होत असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
6 / 7
चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत यंदा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय या आगमन सोहळ्यादरम्यान ठिकठिकाणी दानपेट्या ठेवण्यात येणार आहेत. यात जमा होणारा निधी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे.