Toofaan : ‘तूफान’च्या टीमचा अनोखा उपक्रम, व्‍हर्च्‍युअल शहरी दौऱ्याच्‍या माध्‍यमातून पुण्‍याला भेट

भारतातील विविध शहरांना व्‍यापून घेणाऱ्या या अद्वितीय व्‍हर्च्‍युअल दौऱ्यामध्‍ये टीम विविध राज्‍यांमधील मीडिया, चाहते आणि स्‍थानिक हिरोंसोबत गप्‍पागोष्‍टी करताना दिसणार आहेत. (A unique initiative of the 'Toofaan' team, visited Pune through a virtual city tour.)

1/10
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर चित्रपट 'तूफान' सुरू होण्‍यापूर्वी तूफानी टीम – फरहान अख्‍तर, मृणाल ठाकूर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी अद्वितीय व्‍हर्च्‍युअल शहरी दौ-याच्‍या माध्‍यमातून पुण्‍याला भेट दिली.

2/10
भारतभरातील विविध शहरांना व्‍यापून घेणा-या या अद्वितीय व्‍हर्च्‍युअल दौ-यामध्‍ये टीम विविध राज्‍यांमधील मीडिया, चाहते आणि स्‍थानिक हिरोजसोबत गप्‍पागोष्‍टी करताना दिसणार आहे.

3/10
यावेळी मीडियाला चित्रपट निर्मितीची विशेष झलक दाखवण्‍यात आली, ज्‍यामुळे चित्रपटाप्रती त्‍यांची उत्‍सुकता व उत्‍साह वाढला आहे.

4/10
प्रमुख अभिनेता व सह-निर्माता फरहान अख्‍तर 'तूफान'साठी व्‍हर्च्‍युअल शहर भेटीसाठी उत्‍सुक होते, ते म्‍हणाले, ''पुणे हे इतर प्रत्‍येक शहराप्रमाणे उत्तम संस्‍कृती व प्रेरणादायी कथांचे स्‍थान आहे. हे देशातील काही प्रख्‍यात क्रीडा व्‍यक्तिमत्त्वांचे घर आहे आणि आपल्‍याला त्‍यांच्‍या योगदानाचा अभिमान वाटतो. निर्माता व अभिनेता म्‍हणून मला पुण्‍यामधील स्‍थानिक मीडियासोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍याची आणि 'तूफान'च्‍या प्रबळ व प्रेरणादायी कथेबाबत सांगण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद होत आहे. अनेक वर्षांपासून या शहराने मला दिलेले प्रेम व पाठिंबा पाहून मी खूप भारावून गेलो आहे.''

5/10
चित्रपटामधील भूमिकेबाबत सांगताना तो म्‍हणाला, ''चित्रपट 'तूफान'सह मला समजले आहे की, शारीरिकदृष्‍ट्या कितीही प्रबळ असले तरी बॉक्‍सरच्‍या जीवनात सामावून जाणे पूर्णत: नवीन अनुभव आहे. मी भूमिकेसाठी शारीरिकदृष्‍ट्या व मानसिकदृष्‍ट्या तयार असण्‍यासाठी दररोज ८ ते ९ तास प्रखर प्रशिक्षण घेतले. ही भूमिका व कथा माझ्या मनाच्‍या खूप जवळ आहे आणि आशा करतो की, प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल.''

6/10
व्‍हर्च्‍युअल शहर भेटींबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत प्रमुख अभिनेत्री मृणाल ठाकूर म्‍हणाली, ''मी फरहान यांच्‍या मताला दुजोरा देते की, क्रीडाक्षेत्रामध्‍ये पुण्‍याचे मोठे योगदान राहिले आहे. मला येथील लोकांसोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍याचा खूप आनंद होत आहे. मला या शहराबाबत आवडलेली बाब म्‍हणजे येथील विविधता. शहरातील लोकांपासून पाककलेपर्यंत येथे भारतभरातील अनेक भारतीय पाककला पाहायला मिळू शकतात. या शहराबाबत माझ्या काही सर्वोत्तम आठवणी म्‍हणजे तरी मिसळ पाव व भाकरवडी सारख्‍या स्‍वादिष्‍ट पदार्थांवर ताव मारणे. मी प्रत्‍येकवेळी या शहराला भेट देते तेव्‍हा वेळात वेळ काढून गोड व स्‍वादिष्‍ट स्‍थानिक पाककलांचा आस्‍वाद घेते. पाककलेव्‍यतिरिक्‍त पुणे शहर पर्यटन स्‍थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे, माझी काही आवडीची पर्यटन स्‍थळे या शहरांमध्‍ये आहेत.''

7/10
आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना ती म्‍हणाली, ''रिंगणामध्‍ये असलेल्‍या प्रत्‍येक पुरूषाला महिलेचा पाठिंबा असतो. माझी भूमिका अनन्‍या अज्‍जू भाईला अझिझमध्‍ये रूपांतरित करण्‍याच्‍या संपूर्ण प्रवासामध्‍ये उत्‍प्रेरकाची भूमिका बजावते. या भूमिकेला इतरांपेक्षा वरचढ ठरवणारी बाब म्‍हणजे ती आत्‍मविश्‍वासू, दयाळू व उदारमतवादी मुलगी आहे. अनन्‍याची भूमिका साकारल्‍यानंतर मला वाटते की, एक अभिनेत्री म्‍हणून मी अधिक निर्णायक व आत्‍मविश्‍वासू बनली आहे. मला खात्री आहे की बॉलिवूडमधील प्रत्‍येक अभिनेत्रीला अशा प्रकारची भूमिका साकारायला आवडेल. मला आनंद होत आहे की, मला प्रबळ व नीडर अनन्‍याची भूमिका साकारण्‍याची ही संधी मिळाली आहे.''

8/10
एक्‍सेल एंटरटेन्‍मेंट व आरओएमपी पिक्‍चर्ससोबत सहयोगाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ प्रस्‍तुत चित्रपट 'तूफान' हा रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा व फरहान अख्‍तर यांची निर्मिती असलेला प्रेरणादायी स्‍पोर्टस् ड्रामा आहे. या चित्रपटामध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे प्रमुख भूमिकेत फरहान अख्‍तरसह मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रि‍या पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे दिग्दर्शन असलेल्‍या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर आपल्‍याला स्‍थानिक गुंड अज्‍जू भाईचा व्‍यावसायिक बॉक्‍सर अझिझ अली बनवण्‍यापर्यंतच्‍या प्रवासाची झलक दाखवतो.

9/10
'तूफान' ही आवड व चिकाटीने भरलेली आशा, निष्‍ठा व अंतरिक शक्‍तीची कथा आहे. 'तूफान' हा एकाच वेळी हिंदी व इंग्रजीमध्‍ये 240 देश व प्रदेशांमध्‍ये 16 जुलै 2021 पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रिमिअर होणारा पहिला चित्रपट असेल.

10/10
अपरिहार्य वातावरणामध्‍ये डोंगरीच्‍या रस्‍त्‍यावर जन्‍मलेला एक अनाथ मुलगा मोठा होऊन स्‍थानिक गुंड बनतो. तो मोहक व दयाळू तरूणी अनन्‍याला भेटल्‍यानंतर त्‍याच्‍या जीवनाला कलाटणी मिळते. ती त्‍याला योग्‍य दिशेने जाण्‍यास मार्गदर्शन करते. प्रेम व मार्गदर्शनासह त्‍याला खेळाप्रती आवड निर्माण होते आणि तो जागतिक दर्जाचा बॉक्‍सर बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल सुरू करतो. ही प्रेरणादायी कथा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI