Bigg boss Marathi 3 | तृप्ती देसाई, कीर्तनकार शीवलीला पाटील ते उत्कर्ष शिंदे, बिग बॉस मराठीमधील 15 स्पर्धकांची पूर्ण यादी

अक्षय वाघमारे हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. विशेष म्हणजे राजकारणी अरुण गवळी यांचा तो जावई आहे. वाघमारेनेसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केलाय.

1/15
प्रसिद्ध अभिनेता विशाल निकमने बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे.  दख्खनचा राजा जोतीबा या प्रसिद्ध मालिकेत जोतीबा हे पात्र साकारून त्याने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर आपलं नाव कोरलेलं आहे. मिथून या मराठी चित्रपटातसुद्धा तो  झळकलेला आहे.

2/15
सुरेखा कुडची हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असं नाव आहे. सुरेखा यांनी यापूर्वी अनेक मराठी चित्रपटांत अभिनय केलेला आहे. एकूण पन्नासपेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. सुरखे यांनीदेखील बिग बॉस मराठीच्या सिझन तीनमध्ये सहभाग नोंदवला आहे.

3/15
सोनाली पाटील हे मराठी प्रेक्षकांसाठी नवं नाव नाही. मागील कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राने  तिला वेगवेगळ्या मालिकांमधून पाहिलेलं आहे. सोनालीनेही यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे.

4/15
बायको अशी हव्वी मालिकेतील अभिनेता विकास पाटील यानेसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. प्रवेशावेळी विकासने दमदार नृत्य सादर केले.

5/15
कीर्तनकार शीवलिला पाटील यांनी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. त्या एक प्रसिद्ध कीर्तनकार असून महाराष्ट्रभर त्यांचे चाहते आहेत. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना त्यांनी कीर्तन सादर केले.

6/15
संतोष चौधरी हा प्रसिद्ध पार्श्वगायक आहे. त्यानेदेखील बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचा बप्पी लाहिरी अशी संतोष चौधरीची ओळख आहे.

7/15
वेगवेगळ्या रिअ‌ॅलिटी शोमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेणारी मीनल शाहनेसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. यापूर्वी हिंदी रिअॅलिटी शो Roadies मध्ये तिने आपला सहभाग नोंदवलेला आहे.

8/15
आपल्या खणखणीत आवाजाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक डॉ. उत्कर्ष शिंदेनेसुद्धा बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री मारलीय.

9/15
येऊ कशी कशी मी नांदायला तसेच माझ्या नवऱ्याची बायको अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथनेही बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे.

10/15
हिंदी टीव्ही शो Splitsvilla मध्ये आपला सहभाग नोंदवलेला मराठमोळा अभिनेता जय दुधाणे यावेळी बिग बॉस मराठीमधील एक तगडा स्पर्धक असणार आहे.

11/15
गायत्री दातारचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. दातारने प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेसोबत तुला पाहते रे या मालिकेत स्क्रीन शेअर केलेली आहे. कमी वेळेत मोठी प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री म्हणून गायत्री दातारची ओळख आहे.

12/15
छोट्या पडद्यावरील अभिनेता अविष्कार दारव्हेकर हादेखील बिग बॉस मराठीच्या घरातील महत्त्वाचा स्पर्धक असणार आहे. त्याने आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात अशा मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

13/15
स्नेहा वाघ छोट्या पडद्यावरील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. बिग बॉस मराठी सिझन तीनमधील ही एक पॉप्युसर चेहरा असलेली स्पर्धक आहे.

14/15
अक्षय वाघमारे हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. विशेष म्हणजे राजकारणी अरुण गवळी यांचा तो जावई आहे. वाघमारेनेसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केलाय.
अक्षय वाघमारे हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. विशेष म्हणजे राजकारणी अरुण गवळी यांचा तो जावई आहे. वाघमारेनेसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केलाय.
15/15
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी त्या जमेल ते प्रयत्न करणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI