बॉलिवूडकरांची ‘लगीनघाई’! ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेता विनीत कुमार सिंह अडकला लग्नबंधनात

विनीत कुमार सिंहने आपल्या लग्नाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ‘मुक्काबाज’ फेम अभिनेता विनीतने त्याच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

1/5
विनीत कुमार सिंहने आपल्या लग्नाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ‘मुक्काबाज’ फेम अभिनेता विनीतने त्याच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करून विनीतने सांगितले की, त्याने त्याची गर्लफ्रेंड रुचिरासोबत सात फेरे घेतले आहेत.

2/5
या फोटोंमध्ये विनीतने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. त्याचबरोबर रुचिराने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. फोटो शेअर करताना विनीतने लिहिले की, ‘मी तुझा हात धरून इथपर्यंत आलो आहे. मी भाग्यवान आहे की, तू माझ्या आयुष्यात आहेस. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद.’

3/5
8 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी नागपुरात लग्न केले आहे. आपल्या लग्नाबद्दल बोलताना विनीतने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आम्ही कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. लग्नासाठी आम्ही दोघांनी खूप प्लॅनिंग केले. आमच्या लग्नात महाराष्ट्रीय आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पद्धती होत्या.

4/5
विनीत पुढे म्हणाला, रुचिरा ही देखील एक अभिनेत्री आहे आणि आम्ही आधीच स्पष्ट केले होते की, आम्ही आमचे वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवू. आम्ही एकत्र खूप काही पाहिले आहे. प्रत्येक प्रसंगात ती माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. आता आम्ही आमचे नवीन आयुष्य सुरू केले आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत.

5/5
विनीतने आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मुक्काबाज’, ‘बेताल’ आणि ‘बार्ड ऑफ ब्लड’ या चित्रपटात त्याने उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI