अक्षय कुमार (Akshay Kumar) सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जास्त पोस्ट करत नसला तरी आज ट्विंकलच्या वाढदिवसाला अभिनेता चक्क कवी बनला आहे. पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने लिहिले की, ‘तू माझ्यासोबत आहेस, त्यामुळे आयुष्यातील सर्व अडचणींशी लढणे माझ्यासाठी सोपे आहे. टीना वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
1 / 5
ट्विंकल अनेकदा अक्षयसोबत रोमँटिक फोटोंद्वारे अशी धमाल करतानाचे फोटो शेअर करते. एकमेकांसोबत रोमँटिक पोस्ट टाकण्याऐवजी ते एकमेकांवर विनोद करणाऱ्या पोस्ट करतात.
2 / 5
दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्याच वेळी वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या एकमेकांना समर्थन देतात.
3 / 5
ट्विंकल आणि अक्षय सध्या मालदीवमध्ये कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहेत. तेथेच ते नवीन वर्ष साजरे करतील.
4 / 5
आजचा दिवस ट्विंकलसाठी खूप खास आहे कारण आज तिचे वडील राजेश यांचीही जयंती आहे. यावेळी ट्विंकलने लहानपणीचा एक फोटो शेअर करत लिहिले, ‘ते नेहमी म्हणायचे की त्यांच्या वाढदिवसाची सर्वात चांगली भेट म्हणजे मी त्यांच्या आयुष्यात आले. हा आजचा दिवस आमचा आहे आणि नेहमीच असणार आहे.’