Sayali Sanjeev | ‘तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं..’, ‘पितृछत्र’ हरपल्यानंतर सायलीची भावूक पोस्ट

मराठी मालिका आणि चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. सायलीनेच ही दु:खद बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली.

1/5
मराठी मालिका आणि चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. सायलीनेच ही दु:खद बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली. सायलीच्या वडिलांचं 30 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते.

2/5
वडिलांच्या जाण्याने अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळा असून, तिने सोशल मीडियावर अतिशय भावूक पोस्ट लिहिली आहे.

3/5
सायलीने वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं ..’

4/5
यासोबतच तिने एक कविता देखील पोस्ट केली आहे, ‘दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.. आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा..’

5/5
‘बाबा, थांब ना रे तू, बाबा, जाऊ नको दूर….’ अशी आर्त साद देत तिने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सायली तिच्या बाबांच्या खूप जवळ होती. सायलीची ही पोस्ट वाचून चाहत्यांसह कलाकार देखील भावूक झाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI