By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
अभिनेत्री सोनल चौहाननं आपल्या करिअरची सुरूवात हिमेश रेशमिया यांच्या 'आप का सूरूर' या गाण्यातून केली होती.
2008 मध्ये सोनलने जन्नत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात सोनलसोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होते.
जन्नत चित्रपटासाठी सोनल चौहानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर, सोनल काही काळानंतर 2012 मध्ये ‘पहला सितारा’ या चित्रपटात दिसली. यादरम्यान तिनं तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
यानंतर सोनल ‘थ्री जी’ या चित्रपटात झळकली. यादरम्यान सोनलला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
हिंदी इंडस्ट्रीत चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे सोनम पुन्हा साऊथ इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे.
सोनल चौहान यांना 2005 मध्ये मिस वर्ल्ड टुरिझम अवॉर्ड मिळाला होता.
सोनल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.
अभिनयाशिवाय सोनल एक उत्तम गायिकाही आहे. सोनलने थ्री जी या चित्रपटात ‘कैंसे बताये तुम्हे’ हे गाणं गायलं होतं.
सोनल आता ‘द पॉवर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सोनलसोबत विद्युत जामवाल आणि श्रुति हसन मुख्य भूमिकेत आहेत.