Utpal Dutt Death Anniversary | उत्पल दत्त यांना तुरुंगात धाडणे काँग्रेसला पडले महागात, निवडणुकीतही झाला होता पराभव!

'गोलमाल' चित्रपटातील अभिनेता उत्पल दत्त यांचा अभिनय पाहून प्रेक्षक पोट धरून हसतात. उत्पल दत्त एक अभिनेता असण्याबरोबरच एक राजकीय कार्यकर्ता देखील होते. हे त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येते. 19 ऑगस्ट 1993 उत्पल दत्त यांनी कोलकातामध्ये अखेरचा श्वास घेतला.

1/6
'गोलमाल' चित्रपटातील अभिनेता उत्पल दत्त यांचा अभिनय पाहून प्रेक्षक पोट धरून हसतात. उत्पल दत्त एक अभिनेता असण्याबरोबरच एक राजकीय कार्यकर्ता देखील होते. हे त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येते. 19 ऑगस्ट 1993 उत्पल दत्त यांनी कोलकातामध्ये अखेरचा श्वास घेतला. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी...

2/6
अभिनेते उत्पल दत्त यांचा जन्म बांगलादेशच्या बरीसाल जिल्ह्यात झाला होता. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण शिलाँगमधून पूर्ण केले. येथून त्यांचे वडील गिरीजा रंजन दत्त यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी कोलकाता येथे पाठवले. उत्पल दत्त यांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा कल रंगभूमीकडे वाढू लागला.

3/6
1940 मध्ये, उत्पल दत्त इंग्रजी रंगमंचात सामील झाला आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यावेळी त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. नाटकांचे दिग्दर्शन आणि लेखन करण्याचे कामही त्यांनी केले. बंगालचे राजकारण त्यांच्या अनेक नाटकांमध्ये दिसले, ज्यामुळे खूप वादही झाले.

4/6
उत्पल दत्तची यां नाटकं जनतेला आवडली, पण सरकार त्याच्यावर नाराज होते. ते एक महान मार्क्सवादी क्रांतिकारक होते. त्यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली अनेक बंगाली नाटके वादात अडकली होती, त्यापैकी एक 1963मध्ये आलेले 'कल्लोल' होता. यात नौदलाच्या विद्रोहाची कथा दाखवण्यात आली आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला लक्ष्य केले.

5/6
बंगालमधील काँग्रेस सरकारने 1965मध्ये उत्पल दत्त यांना अनेक महिने तुरुंगात डांबले होते. 1967मध्ये बंगाल विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेस सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यात पहिल्यांदाच डाव्या पक्षांचे युतीचे सरकार स्थापन झाले.

6/6
उत्पल दत्त यांची अटक हे काँग्रेस सरकारच्या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण मानले गेले. जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा उत्पल दत्त यांनी ‘बॅरिकेड’, ‘सिटी ऑफ नाइटमेर्स’, ‘इंटर द किंग’ ही तीन नाटके लिहिली. त्यावेळी सरकारने त्यांच्या तीनही नाटकांवर बंदी घातली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI