भारतात गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनानं डोकं वर काढलं आहे. (Corona preventive vaccine in final stages; See how much you have to pay)
1/7

भारतात जवळजवळ 10 महिन्यांपासून कोरोनानं डोकं वर काढलं आहे. आता प्रत्येक जण कोरोनापासून वाचण्यासाठी लस कधी येणार याची प्रतिक्षा करत आहे. मिळालेल्या माहिती नुसार येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये कोरोनाची लस मिळणार आहे. आता प्रश्न आहे की कोणती लस कधी येणार आणि त्यासाठी सामान्य जनतेला किती रुपये मोजावे लागतील.
2/7

तर या लिस्टमध्ये सगळ्यात पुढे आहे 'मॉडर्ना इंक' ची 'mRNA-1273'लस. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या लसीसाठी सामान्य जनतेला 1400 रुपये मोजावे लागतील. चार आठवड्यांमध्ये दोन वेळा ही लस घ्यावी लागणार आहे.
3/7

अमेरिकेची कंपनी 'फायजर' सुद्धा या यादीत पुढे आहे. या कंपनीच्या दाव्यानुसार ही लस येत्या डिसेंबरपर्यंत सामान्य जनतेला मिळेल. या लसीसाठी 1483 रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचे प्रत्येकी दोन डोज सामान्य व्यक्तीला घ्यावे लागतील.
4/7

'ऑक्सफर्ड'ची 'एस्ट्राजेनेका' लससुद्धा शेवटच्या टप्यात आहे. या लसीसाठी 500 रुपये मोजावे लागतील. दोन डोस प्रत्येक व्यक्तीला घ्यावे लागणार आहेत.
5/7

'जॉन्सन अॅन्ड जॉन्सन' कंपनीची 'JNJ-78436735' ही लस शेवटच्या टप्यात आहे. या लसीची किंमत 742 रुपये असणार आहे. या लसीचा एकच डोस प्रत्येक व्यक्तीला घ्यावा लागणार आहे.
6/7

रशियाच्या दाव्यानुसार आता त्यांची लस 'स्पुतनिक V' बाजारात येण्यासाठी तयार आहे. महत्वाचं म्हणजे रशियाच्या नागरिकांना या लसीसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. मात्र इतर देशांना ही लस किती रुपयांमध्ये मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
7/7

भारतीय लॅबमध्ये तयार होत असलेली 'भारत बायोटेक'ची लस आता शेवटच्या टप्यात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. या लसीसाठी सामान्य नागरिकांना 100 रुपये मोजावे लागणार आहेत.