PHOTO | दिल्लीत कोरोनाचा संसर्गाचा प्रकोप, बसस्थानकांवर प्रवाशांची कोरोना चाचणी

नवी दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लायओवरवर दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. (corona test new delhi)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:04 PM, 23 Nov 2020
दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट लक्षात घेऊन बसस्थानकांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
उत्तर दिल्ली महापालिकेने एका आठवड्यासाठी नांगलोईतील जनता मार्केटवर बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने जनता मार्केटमध्ये ही कारवाई केली आहे. दिल्लीतील आनंद विहार बसस्थानकावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली.
रविवारी दिल्लीत कोरोनाचे 6,746 नवीन रुग्ण आढळले आणि 121 जणांचा मृत्यू झाला तर 6,154 लोक बरे झाले.
नवी दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लायओवरवर दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश सरकारनं दिल्लीतून राज्यात परत येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डीएनडी फ्लायओवर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येतेय.