AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’ने रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विक्रम मोडला; स्वामीभक्तांकडून जबरदस्त प्रतिसाद

Deool Band 2 : 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. प्रदर्शनाला एक महिना उलटूनही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

| Updated on: Jun 21, 2026 | 1:38 PM
Share
प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट अवघ्या 9 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. इतक्या छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: कमाईचा पूर आणला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 600 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. प्रदर्शनाला महिना उलटूनही हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये दमदार कमाई करत आहे.

1 / 5
या चित्रपटाने आता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 31 व्या दिवशी 1.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर नेट कलेक्शनचा आकडा 90 लाख रुपये आहे. 336 शोजमध्ये 32 टक्के ऑक्युपन्सीसह या चित्रपटाने एवढी कमाई केली आहे.

2 / 5
'देऊळ बंद 2' या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 83.58 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर नफ्याची टक्केवारी 612% इतकी आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.89 कोटी रुपये आणि पहिल्या आठवड्यात 30.20 कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात 22.40 कोटी रुपयांची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यात 11.15 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. तर चौथ्या आठवड्यात 6.22 कोटी रुपये कमावले.

3 / 5
'देऊळ बंद 2' हा मराठीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाने आता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या सिनेमालाही मागे टाकलं आहे. रितेशच्या या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनने 70.98 कोटी रुपये कमावले होते. तर 'देऊळ बंद 2'ने 71.18 कोटी रुपये कमावले आहेत.

4 / 5
'देऊळ बंद 2' हा चित्रपट पुढील काही दिवसांत 'बाईपण भारी देवा' या चित्रपटालाही मागे टाकणार असल्याचं चित्र आहे. केदार शिंदेंच्या या चित्रपटाने 76.28 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर पहिल्या क्रमांकावर नागराज मंजुळे यांचा 'सैराट' हा चित्रपट आहे. 'सैराट'ने 80.97 कोटी रुपये कमावले आहेत.

5 / 5
Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार