PHOTO | कोण आहेत रोहिणी खडसे ज्यांना जयंत पाटलांनी व्याजासकट परतफेड करण्याचा शब्द दिला?

1/6
भाजपला घराघरात घेऊन जाण्यात मोलाचे योगदान देणारे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यांनतर त्यांची कन्या रोहीणी खडसे यासुद्धा चर्चेत आल्या.

2/6
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने रोहिणी खडसे यांचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. तसेच, रोहिणी खडसे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.

3/6
रोहिणी खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. मुक्ताईनगर तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचे पिता एकनाथ खडसे यांच्यासोबतच त्यांचेही मोठे राजकीय प्रस्थ असल्याचे सांगितले जाते. जळगावमधील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत त्या हिरिरिने सहभाग नोंदवतात.

4/6
राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथ खडसे हे भाजप या पक्षात होते. 2019 च्या विधानसभेत एकनाथ खडसे यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर खडसे समर्थकांनी नाराजीचा सूर आळवल्याने भाजपने त्यांची कन्या म्हणजेच रोहिणी खडसे यांनी तिकीट दिले. त्यांनतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

5/6
त्यानंतर रोहिणी खडसे यांनी भाजपच्या तिकीटावर मुक्ताईनगर या मतदारसंघातून  निवडणूक लढवली. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी येथे मोठी प्रचारमोहीम राबवली होती. मात्र,  त्यांचा पराभव झाला. यावेळी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना पराभूत केले होते. याच कारणामुळे पुढच्या वेळी रोहिणी खडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

6/6
जनतेशी बांधिकली जपण्यासाठी रोहिणी खडसे मुक्ताईनगरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतात. ग्रामसभा, महिलांसाठीचा हळदी कुंकू कार्यक्रम तसेच जनतेच्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन त्यावर काम करण्यासाठी त्या कायम तत्पर असतात. त्या एक उत्तम फोटोग्रापरसुद्धा आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI