Immunity Booster | कोरोना काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि वाढवा इम्युनिटी !

कोरोनाच्या काळात आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आता गरजेचे झाले आहे. व्हायरल इन्फेक्शन आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी व्हिटामिन-सी आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे.

Apr 18, 2021 | 11:59 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 18, 2021 | 11:59 AM

कोरोनाच्या काळात आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आता गरजेचे झाले आहे. व्हायरल इन्फेक्शन आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी व्हिटामिन-सी आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला आहारात जास्तीत-जास्त व्हिटामिन-सी युक्त फळे घ्यावी लागणार आहेत.

1 / 5
पेरूमध्ये व्हिटामिन सी आणि पोषक तत्वांचे प्रमाण खूप आहे. पेरू रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास, तसेच मधुमेह कमी करण्यास मदत करतो. पेरूमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीराचा संसर्गापासून बचाव करतात. पेरूमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढायला मदत होते. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात.

2 / 5
व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए समृद्ध असलेले कलिंगड आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. याशिवाय हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. कलिंगडमध्ये खूप कमी कॅलरी असतात, परंतु यामुळे आपल्या पोटात बर्‍याच काळासाठी पोट भरले जाते. 100 ग्रॅम कलिंगडमध्ये फक्त 30 ग्रॅम कॅलरी असतात. यात सुमारे 1 मिलीग्राम सोडियम, कार्बोहायड्रेट 8 ग्रॅम, फायबर 0.4 ग्रॅम, साखर 6 ग्रॅम, व्हिटॅमिन ए 11 टक्के, व्हिटॅमिन सी 13 टक्के, प्रथिने 0.6 ग्रॅम असतात. ही सर्व पोषक तत्वे आपणास हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयोगी पडतात.

3 / 5
किवी हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. -विशेष म्हणजे किवीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महाराष्ट्रात ज्याप्रकारे कोरोनाचा कहर सुरू आहे या वातावरणात तर किवी खाणे आपल्या आरोग्यासाठी आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी किवी खाणे गरजेचे झाले आहे.

4 / 5
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबूच्या सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबाचा रस, लिंबाचे तेल, सायट्रिक अॅसिड यांचा निरनिराळ्या औषधी बनविण्यात उपयोग करतात. लिंबाप्रमाणेच, लिंबाच्या सालीचाही उपयोग करता येतो. लिंबू पाणी पिणे अनेक लोकांना आवडते तर काही लोकांची सुरूवातच लिंबू पाणी पिण्याने होते. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें