AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना अफेअर, ना फसवणूक.. ‘या’ कारणामुळे ‘बिग बॉस’ विजेता घेतोय घटस्फोट? कारण वाचूल व्हाल थक्क!

गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाने नोव्हेंबर 2016 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण काय असू शकतं, असा प्रश्न चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत. आकांक्षाच्या वक्तव्यावर अद्याप गौरवने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

| Updated on: Jun 28, 2026 | 10:53 AM
Share
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपं गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'बिग बॉस 19' आणि 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया 1'चा विजेता गौरव खन्नाच्या पत्नीने 'लॉक अप 2'मध्ये त्यांच्या घटस्फोटाचा मोठा खुलासा केला. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत, असं आकांक्षाने सांगितलं.

1 / 5
सर्वकाही ठीक असताना लग्नाच्या दहा वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा विचार का केला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या खुलाशानंतर सोशल मीडियावर गौरवचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात असताना गौरव सहस्पर्धक मृदुल तिवारीसोबत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाला होता. हाच व्हिडीओ आता चर्चेत आला आहे.

2 / 5
या व्हिडीओमध्ये गौरव म्हणतो, "माझ्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत, पण आमचं बाळ नाहीये. कारण मी माझ्या पत्नीच्या इच्छेचा आदर करतो. एकेकाळी मला मुलं हवी होती, पण आकांक्षा त्यासाठी तयार नव्हती. नंतर मी तिचा निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता प्रेम केलंय तर निभवावं लागेलच. बाळ ही एक खूप मोठी जबाबदारी असते. मी स्वत: दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्त असतो, अशातच जर आकांक्षानेही काम सुरू केलं तर मुलाची देखभाल, संगोपन कोण करणार? बाहेरच्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवणं मला योग्य वाटत नाही."

3 / 5
नंतर जेव्हा आकांक्षा बिग बॉसच्या फॅमिली वीकदरम्यान घरात गेली, तेव्हा तिने मालती चाहर आणि प्रणीत मोरेसमोर फॅमिली प्लॅनिंगबद्दल तिचा दृष्टीकोन सांगितला. "मी कोणतीच प्लॅनिंग करत नाहीये, असं नाही. पण आतापर्यंत मला तशी इच्छा झाली नाही. भविष्यातही मला ही गोष्ट खूप कठीण वाटते. माहीत नाही का, पण माझ्यात ती भावनाच नाही. मला बाळ जन्माला घालण्याची गरजच भासत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप बहाणे, कारणं शोधता, तेव्हा त्याचा थेट अर्थ असाच होतो की तुम्ही त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही", असं आकांक्षा म्हणाली होती.

4 / 5
याच चर्चेदरम्यान जेव्हा मालतीने आकांक्षाला विचारलं की, तिला आई होण्याच्या जबाबदारीची भीती वाटते का? त्यावर तिने म्हटलं होतं, "मला भीती वाटत नाही, पण इतकी मोठी जबाबदारी मी पूर्ण करू शकेन, असं मला वाटत नाही. बाळ जन्माला घालणं म्हणजे मिठाई बनवण्याइतकं सोपं काम नसतं. तुम्हाला कोणत्याही वयात 100 टक्के द्यावे लागतात. जर मला लोक स्वार्थी म्हणत असतील, तर तो त्यांचा विचार आहे."

5 / 5
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान