विनामास्क फिरताना आढळल्यास राज्यासह देशातील विविध भागात किती रुपयांचा दंड भरावा लागणार?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:50 AM, 25 Nov 2020
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह देशाची राजधानी दिल्लीपर्यंत सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुंबईत विनामास्क फिरताना आढळल्यावर नागरिकांना आता 200 रुपये दंड भरावा लागणार आहे, तर हीच दंडाची रक्कम दिल्लीमध्ये 2000 हजार रुपये इतकी आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांना दिल्लीत सर्वाधिक दंड भरावा लागत आहे. दिल्लीत कोणतीही व्यक्ती विनामास्क फिरताना आढळ्यास त्याच्याकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात आहे.
दिल्लीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात योगी आदित्यनाथ सरकारकडून विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांकडून कर्नाटक राज्यातील शहरांमध्ये 250 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. तर ग्रामीण भागातील लोकांना 100 रुपये दंड भरावा लागत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांकडून तमिळनाडू सरकार 200 रुपये इतका दंड वसूल करत आहे.
मास्क न घालता फिरणाऱ्यांवर गुजरात सरकारनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. गुजरातमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांकडून 1000 रुपये इतका दंड वसूल केला जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड वसूल केला जात आहे.
विनामास्क फिरणाऱ्यां पुणेकरांना 500 रुपयांचा दंड भरणे बंधनकारक आहे.