AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

23 वर्षीय पठ्ठ्याने आफ्रिकेत जाऊन रचला इतिहास, ठरला महाराष्ट्राचा माऊंटन मॅन

डोंबिवलीचा २३ वर्षीय आर्यन शिरवळकरने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमंजारो सर केले आहे. सात दिवसांच्या कठीण मोहिमेत त्याने १९,३४१ फूट उंची गाठली. ठाणे जिल्ह्यातील तो पहिला गिर्यारोहक आहे ज्याने हे यश मिळवले आहे

| Updated on: Jul 21, 2025 | 11:59 AM
Share
डोंबिवलीच्या २३ वर्षीय आर्यन शिरवळकरनं आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलिमांजारो सर करत भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे. अवघ्या सात दिवसांच्या मोहिमेत १९,३४१ फूट (५,८९५ मीटर) उंची गाठत आर्यननं हे शिवधनुष्य पेललं. विशेष म्हणजे, ठाणे जिल्ह्यातून हा पर्वत सर करणारा तो पहिला गिर्यारोहक ठरला आहे.

1 / 8
डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी विभागातील पाम व्ह्यू सोसायटीत राहणाऱ्या आर्यनला लहानपणापासूनच निसर्गाची आवड आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्याने गिर्यारोहणाला सुरुवात केली. मनालीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर, वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने १३,५०० फूट उंचीचा पथल शु माउंटन सर केला होता.

2 / 8
याव्यतिरिक्त, त्याने भारतातील हिमाचल, उत्तराखंड आणि इतर राज्यांतील ५० हून अधिक पर्वत आणि गड-किल्ले, तसेच महाराष्ट्रातील ५०० हून अधिक गड-किल्ले सर केले आहेत. यानंतर ६ जुलै ते १२ जुलै २०२५ या सात दिवसांच्या मोहिमेत आर्यनने माऊंट किलिमांजारो सर केला.

3 / 8
या प्रवासात त्याला कमी वायुदाब, कमी ऑक्सिजन, लांबवर पसरलेले रस्ते आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता अशा अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. तरीही त्याने जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर १२ जुलै रोजी शिखरावर पोहोचून भारताचा तिरंगा दिमाखाने फडकवला.

4 / 8
गेल्या सात वर्षांपासून आर्यन आउटडोअर क्षेत्रात सक्रिय आहे. त्याने भारतातील विविध निसर्गरम्य भागांमध्ये ४०० हून अधिक ट्रेक्स आणि ॲडव्हेंचर अनुभवांचे यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. यामध्ये डे ट्रेक्स, मल्टी-डे बॅकपॅकिंग ट्रिप्स आणि हिमालयातील ट्रेक्सचा समावेश आहे.

5 / 8
आर्यनने अब्विमास (ABVIMAS) मधून माउंटेनिअरिंग इन्स्ट्रक्टर कोर्स पूर्ण केला असून, बेसिक माउंटेनिअरिंग कोर्समधील प्रशिक्षणार्थ्यांना त्याने व्याख्यानेही दिली आहेत. तसेच, त्याने हनिफल सेंटरमधून आउटडोअर लीडरशिप कोर्स आणि एरी बॅककंट्री मेडिसिन (Aerie Backcountry Medicine) द्वारे विल्डरनेस फर्स्ट रिस्पॉन्डर (WFR) प्रमाणपत्रही मिळवले आहे. आतापर्यंत त्याने १० हून अधिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम अल्फा ग्रेडमध्ये पूर्ण केले आहेत.

6 / 8
सध्या आर्यन महाराष्ट्रातील विविध कंपन्यांसाठी प्राथमिक उपचार, आउटडोअर शिक्षण, नेतृत्व कौशल्ये आणि समस्यांचे निराकरण यावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे घेत आहे. 'Leave No Trace (LNT)' तत्त्वांचा विचार करून, जास्तीत जास्त लोकांना निसर्गात घेऊन जाणे आणि त्यांना निसर्गाचे संवर्धन करण्याचे मार्गदर्शन करणे हे त्याचे ध्येय आहे. याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्याचा मानस आहे.

7 / 8
किलिमांजारो सर करून डोंबिवलीतील आपल्या घरी परतताच, आर्यनच्या इमारतीतील रहिवाशांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले. आर्यनच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

8 / 8
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.