IPL 2021 | ‘सर’ रवींद्र जाडेजाला मोठ्या विक्रमाची संधी, मनिष पांडेही किर्तीमान रचणार

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात (Ravindra Jadeja) रवींद्र जाडेजा आणि मनिष पांडेला (Manish Pandey) किर्तीमान करण्याची संधी आहे.

1/4
IPL, IPL 2021, ms dhoni, CSK vs SRH, SRH vs CSK, Head to Head Records, David Warner, Mahendra Singh Dhoni, ravindra jadeja, manish pandey, jonny bairstow
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि हैदराबादच्या मनिष पांडेला किर्तीमान करण्याची संधी आहे.
2/4
IPL, IPL 2021, ms dhoni, CSK vs SRH, SRH vs CSK, Head to Head Records, David Warner, Mahendra Singh Dhoni, ravindra jadeja, manish pandey, jonny bairstow
जाडेजाला टी 20 क्रिकेटमध्ये षटकारांचं शतक झळकावण्यासाठी 2 सिक्सची आवश्यकता आहे. जाडेजाने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 98 सिक्स लगावले आहेत. जाडेजाने या सामन्यात 2 सिक्स लगावताच त्याच्या नावे 100 सिक्सची नोंद होईल.
3/4
IPL, IPL 2021, ms dhoni, CSK vs SRH, SRH vs CSK, Head to Head Records, David Warner, Mahendra Singh Dhoni, ravindra jadeja, manish pandey, jonny bairstow
मनिष पांडेला मागील 2 सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने निवड समितीला काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर या सामन्यात पांडे खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनिष पांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याचा हा आजचा आयपीएल कारकिर्दीतील 150 वा सामना ठरेल.
4/4
IPL, IPL 2021, ms dhoni, CSK vs SRH, SRH vs CSK, Head to Head Records, David Warner, Mahendra Singh Dhoni, ravindra jadeja, manish pandey, jonny bairstow
आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 विकेटकीपर्सने 1 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जॉनी बेयरस्टोला विकेटकीपर बॅट्समन म्हणून अशी कामगिरी करण्याची संधी आहे. यासाठी त्याला 71 धावांची आवश्यकता आहे. बेयरस्टो 71 धावा करताच तो 5 वा विकेटकीपर फलंदाज ठरेल.