IPL 2021 DC vs PBKS Head to Head | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने, हे 4 खेळाडू निर्णायक भूमिका बजावणार

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 11 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

1/5
DC vs PBKS, PBKS vs DC, Delhi Capitals vs Punjab Kings, Punjab Kings vs Delhi Capitals, Head to Head Records, IPL 2021, KL Rahul, Rishabh Pant, Shikhar Dhawan, mohammed shami, Amit Mishra,
आयपीएलच्या 14 व्या पर्वात आजपासून डबल हेडर सामन्यांना सुरुवात झाली आहे. या डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्यात विकेटकीपर कर्णधार रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यातही कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
2/5
DC vs PBKS, PBKS vs DC, Delhi Capitals vs Punjab Kings, Punjab Kings vs Delhi Capitals, Head to Head Records, IPL 2021, KL Rahul, Rishabh Pant, Shikhar Dhawan, mohammed shami, Amit Mishra,
उभयसंघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब वरचढ राहिली आहे. पंजाबने दिल्लीवर 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे.
3/5
DC vs PBKS, PBKS vs DC, Delhi Capitals vs Punjab Kings, Punjab Kings vs Delhi Capitals, Head to Head Records, IPL 2021, KL Rahul, Rishabh Pant, Shikhar Dhawan, mohammed shami, Amit Mishra,
भारतात हे दोन्ही संघांचा एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 9 वेळा दिल्लीने विजय मिळवला आहे. तर 13 वेळा पंजाबने दिल्लीचा धुव्वा उडवला आहे.
4/5
DC vs PBKS, PBKS vs DC, Delhi Capitals vs Punjab Kings, Punjab Kings vs Delhi Capitals, Head to Head Records, IPL 2021, KL Rahul, Rishabh Pant, Shikhar Dhawan, mohammed shami, Amit Mishra,
दिल्ली विरुद्ध पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 137 धावा केल्या आहेत. तसेच मोहम्मद शमीने 8 विकेट्स पटकावल्या आहेत.
5/5
DC vs PBKS, PBKS vs DC, Delhi Capitals vs Punjab Kings, Punjab Kings vs Delhi Capitals, Head to Head Records, IPL 2021, KL Rahul, Rishabh Pant, Shikhar Dhawan, mohammed shami, Amit Mishra,
तसेच पंजाब विरुद्ध दिल्लीचा 'गब्बर' शिखर धवनने सर्वाधिक 200 धावा केल्या आहेत. तर अमित मिश्राने 10 विकेट्स मिळवल्या आहेत.