आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज (23 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत रंगणार आहे. पंजाबला या मोसमात विजयासाठी संघर्ष करावा लागलातो. पंजाबने या पर्वाची विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतरच्या 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तर मुंबईने फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे दिल्ली विरुद्धचा सामना गमावला.
1 / 5
उभयसंघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबने 12 मॅचेसमध्ये मुंबईवर मात केली आहे.
2 / 5
या दोन्ही संघांमध्ये गत मोसमात रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यात पंजाबने डबल सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा पराभव केला होता. दोन्ही संघांनी निर्धारित 20 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या होत्या. यानंतर पहिली सुपर ओव्हर टाय झाली. यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 12 धावांचे आव्हान मिळाले. हे विजयी आव्हान पंजाबने पूर्ण करत विजय साकारला होता.
3 / 5
केएल राहुलने पंजाबकडून मुंबई विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. केएलने पलटण विरुद्ध 3 मोसमात 383 धावा केल्या आहेत. तर मुंबईकडून कायरन पोलार्डने पंजाब विरुद्ध सर्वाधिक 498 धावा चोपल्या आहेत.
4 / 5
मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने या मोसमातील 4 सामन्यांपैकी 2 ऑमॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर पंजाब 1 विजय आणि 3 पराभवांसह 7 व्या क्रमांकावर आहे.