माझ्यासोबत चुकीचं केलं, मी कधीच..; टॉपच्या दिग्दर्शकांबद्दल काय म्हणाली करीना?

अभिनेत्री करीना कपूरने आतापर्यंत बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र करिअरच्या सुरुवातीला तिला बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करायची इच्छा होती. पण एका घटनेनंतर त्या दिग्दर्शकासोबत कधीच काम न करण्याचा निर्णय तिने घेतला.

| Updated on: Jul 03, 2024 | 1:39 PM
अभिनेत्री करीना कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र करिअरच्या सुरुवातीलाच एका दिग्दर्शकांनी तिच्यासोबत असं काही केलं, जे ती आजपर्यंत विसरू शकली नाही.

1 / 5
करीनाचं असं म्हणणं आहे की तिने त्या दिग्दर्शकासोबत कधीच काम केलं नाही आणि करणार नाही. करीना ज्या दिग्दर्शकांबद्दल बोलतेय, ते दुसरे-तिसरे कोणी नसून संजय लीला भन्साळी आहेत.

करीनाचं असं म्हणणं आहे की तिने त्या दिग्दर्शकासोबत कधीच काम केलं नाही आणि करणार नाही. करीना ज्या दिग्दर्शकांबद्दल बोलतेय, ते दुसरे-तिसरे कोणी नसून संजय लीला भन्साळी आहेत.

2 / 5
2002 मध्ये करीना कपूरने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की 'देवदास' या चित्रपटासाठी भन्साळींनी तिची स्क्रीन टेस्ट घेतली होती. इतकंच नव्हे तर तिला सायनिंग अमाऊंटसुद्धा त्यांनी दिली होती.

3 / 5
मात्र भन्साळींनी अचानक कोणतीच कल्पना न देता 'देवदास'साठी दुसऱ्या अभिनेत्रींची निवड केली. मिळालेल्या माहितीनुसार, करीनाच्या जागी भन्साळींनी ऐश्वर्या रायला 'पारो'च्या भूमिकेची ऑफर दिली होती.

मात्र भन्साळींनी अचानक कोणतीच कल्पना न देता 'देवदास'साठी दुसऱ्या अभिनेत्रींची निवड केली. मिळालेल्या माहितीनुसार, करीनाच्या जागी भन्साळींनी ऐश्वर्या रायला 'पारो'च्या भूमिकेची ऑफर दिली होती.

4 / 5
याप्रकरणी नंतर भन्साळींनीही 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली होती. "करीना ही नीता लुल्लासोबत माझ्या घरी आली होती. तिला माझ्यासोबत काम करायचं होतं. पण मी तिचं काम त्याआधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे कॉस्च्युमसोबत मी करीनाचा एक फोटोशूट केला होता. त्यावेळी तिची आई बबिता आणि बहीण करिश्मासुद्धा तिथे उपस्थित होते. मी तेव्हासुद्धा त्यांना स्पष्ट केलं होतं की या फोटोशूटचा अर्थ असा नाही की मी तिला भूमिकेची ऑफर देतोय. तेव्हा त्यांनीसुद्धा ते ऐकलं होतं."

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.