Photo | मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा-म्हाळसेचा विवाह

कराडमधील खंडोबाच्या पालीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असणारा खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा मोजक्या मानकऱ्यांच्या साक्षीने आज संपन्न झाला.

  • दिनकर थोरात, टीव्ही 9 मराठी, कराड
  • Published On - 21:14 PM, 25 Jan 2021
1/4
कराडमधील खंडोबाच्या पालीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असणारा खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा मोजक्या मानकऱ्यांच्या साक्षीने आज संपन्न झाला.
2/4
पेंबर गावातील मुख्य मंदिरातून देवाचे मुखवटे मानकरी नदीपलीकडे घेऊन जातात. यावेळी हे मुखवटे पालखीतून वाजत गाजत विवाहासाठी नेले जातात. यानंतर विवाह मंडपात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा म्हाळसेचा विवाह सोहळा संपन्न होतो.
3/4
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाली खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली. मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आज मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देवाचे धार्मिक विधी पार पाडण्यास शासनाने अनुमती दिली होती.
4/4
कराडमधील खंडोबाच्या पालीच्या यात्रेमध्ये विवाहसोहळा हे मुख्य आकर्षण असते. दरवर्षी या उत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. परंतु यंदा कोरोनाच्या नियमांमुळे हा कार्यक्रम मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.