व्हिटॅमिन डी हे सर्वात आवश्यक जीवनसत्वांपैकी एक मानले जाते. सूर्यप्रकाशापासून ते मिळतेच त्याशिवाय ड्रायफ्रुट्स, साल्मन मासा, चीज, अंड्यातील पिवळा बलक हेही त्याचे उत्तम स्त्रोत आहेत. व्हिटॅमिन डीमुळे केवळ आपल्या आरोग्यालाच नव्हे तर आपली त्वचा आणि सौंदर्यासाठीही त्याचे अनेक फायदे आहेत.