PHOTO | एका शब्दाच्या भूमिकेने सुरु झाला अभिनयाचा प्रवास, प्रसंगी मंदिर बनले घर, अशी होती किशोर नांदलस्करांची सुरुवात…
Harshada Bhirvandekar |
Updated on: Apr 20, 2021 | 4:35 PM
किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. ‘आमराई’ या नाटकातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.
Apr 20, 2021 | 4:35 PM
किशोर नांदलस्कर (Kishore Nandlaskar) यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे बालपणपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता.
1 / 7
‘आमराई’ या नाटकातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. खरं तर या नाटकात त्यांची भूमिका ‘बाप्पा’ अशी हाक मारण्यापूरतीच होती. मात्र, हीच त्यांची खरी सुरुवात होती.
2 / 7
पहिल्याच नाटकात रंगमंचावर गेल्यावर भीती वाटल्यामुळे केवळ ‘बाप्पा’ हा एका शब्दाचा संवाद त्यांच्या तोंडून बाहेर पडला नाही. ऐन नाटकाच्या मध्यात थेट मंचावर अशी फजिती झाल्याने त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांचे हसे केले होते. मात्र, हा माझ्यासाठी पहिला धडा होता असे ते नेहमी म्हणत.
3 / 7
नांदलस्कर यांनी सुमारे 40 नाटके, 30हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि तर, 20हून अधिक मालिकांमधून काम केले होते. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला.
4 / 7
‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.
5 / 7
किशोर नांदलस्कर हे पूर्वी मुंबईतील भोईवाडा-परळ इथे राहात होते. मुंबईतील घर छोटं असल्यामुळे ते मंदिरात झोपायचे. याबाबतचं वृत्त दैनिक सकाळमध्ये आल्यानंतर, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मंजूर केलं होतं. त्यांना बोरिवलीत चांगलं घर मिळालं होतं.
6 / 7
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.