प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी आणि कृशा शाह यांचा विवाह रविवारी (20 फेब्रुवारी) पार पडला.अनमोल आणि कृशा यांचे लग्नातले काही फोटो समोर आले आहेत. यात ते दोघेही लग्नासाठी खास डिझाईन केलेला ड्रेसमध्ये दिसत आहेत.
1 / 5
क्रिशा शाहने लग्नात अनामिका खन्नाच्या कलेक्शनमधील लेहेंगा घातला होता. तिचा लेहेंगा सिल्व्हर सिल्कचा आहे. त्यावर क्रिस्टल्समध्ये फुलांचं भरतकाम केलेला आहे.
2 / 5
क्रिशा शाहने यावेळी परिधान केलेल्या कपड्यांबद्दलही जोरदार चर्चा आहे. क्रिशाचा ब्राइडल लूक अनेकांना आवडला आहे.अंबानी कुटुंबाची सून बनलेल्या क्रिशाने लाखोंचा लेहेंगा आणि करोडो रूपयांचे दागिने घातले होते.
3 / 5
क्रिशा शाहच्या या सुंदर लेहेंग्याची किंमत 5 लाख असल्याची माहिती आहे. जो तिच्यावर अगदीच उठून दिसतोय.
4 / 5
मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या कृशा शाह ही सामाजिक कार्यकर्ती आणि उद्योजक आहे. ती Dysco या सोशल नेटवर्किंग कंपनीची संस्थापक असल्याची माहिती आहे.