Famous Historical Gateways : कुणी स्मारक तर कुणी विजयाची निशाण, ‘हे’ आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक प्रवेशद्वार

मुंबईचा ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि दिल्लीच्या ‘इंडिया गेट’विषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. हे दोन भारतातील सर्वात ऐतिहासिक प्रवेशद्वार आहेत, जे सर्वात लोकप्रिय आहेत. परंतु, असे बरेच अन्य प्रवेशद्वार आहेत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे.

1/5
इंडिया गेट, दिल्ली : दिल्ली मधील सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक म्हणजे इंडिया गेट. हे प्रवेशद्वार राजपथाजवळ बांधलेले युद्ध स्मारक आहे. हे प्रवेशद्वार 1914 ते 1921 दरम्यानच्या पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या 70,000 सैनिकांच्या स्मृतीत बांधले गेले.
2/5
गेट वे ऑफ इंडिया, मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे मुंबईतील एक प्रतिष्ठित स्मारक आहे. हे स्मारक 20व्या शतकाच्या सुरूवातीस ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरीच्या प्रथम आगमनाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते.
3/5
बुलंद दरवाजा, फतेहपूर सिक्री : हा 15 मजली "विजय द्वार" जगातील सर्वात उंच प्रवेशद्वार आहे. 1575मध्ये मुघल बादशहा अकबर याने गुजरातवरील त्याच्या विजयाच्या स्मरणार्थ हे बांधले होते. आग्र्यापासून 43किमी अंतरावर फतेहपूर सिक्री येथील जामा मशिदीचे हे प्रवेशद्वार एक ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे.
4/5
तीन दरवाजा, अहमदाबाद : तीन दरवाजा अहमदाबादमधील भद्रा किल्ल्याच्या पूर्वेकडील दिशेला आहे. हे ऐतिहासिक प्रवेशद्वार 1415 मध्ये बांधले गेले.
5/5
भडकल गेट, औरंगाबाद : औरंगाबादमधील भडकल गेट अहमदनगरच्या मुर्तजा निजामशहाचा वजीर मलिक अंबर यांने बांधला होता. हे मोगलांविरूद्ध विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते, म्हणूनच याला 'विजय द्वार' असेही म्हणतात. हे महाराष्ट्राचे राज्य संरक्षित स्मारक आहे.