वाढलेले वजन कमी करण्यासाठी खरोखरच पाणी मदत करते? जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

निरोगी राहिचे असेल तर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी पितात. कारण जास्त प्रमाणात पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही बदल करा जसे निरोगी खाणे, व्यायाम करणे, रात्री 6-8 तासांची झोप घेणे आणि भरपूर पाणी पिणे, यामुळे फरक पडेल.

1/4
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा लोक एक मोठी चूक करतात ते म्हणजे या दिवसांमध्ये पाण्याचे सेवन कमी प्रमाणामध्ये करत असतात. डॉक्टरांच्या मते ही अत्यंत वाईट सवय आहे. अनेकदा वातावरणामध्ये गारवा असल्यामुळे अनेकांना या दिवसात तहान लागत नाही आणि म्हणूनच अशा वेळी लोक पाणी कमी प्रमाणात सेवन करतात. परंतु थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. जर आपण पाणी कमी प्यायले तर आपल्याला ब्रेन स्ट्रोक ,लकवा सारखे आजार सुद्धा भविष्यात होण्याची शक्यता असते.

2/4
प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की, दिवसातून नेमके किती पाणी प्यायला हवे. आपल्या शरीराला दररोज 8 ग्लास पाण्याची गरज असते. परंतु विविध संशोधकांच्या मते, आपल्याला शरीराला दररोज 4 लिटर पाण्याची आवश्यकता असते.

3/4
जर तुम्ही जेवण करणार असाल तर त्यापूर्वी 20 ते 30 मिनिटे आधी 2 कप पाणी प्या. यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जेवण्याच्या 20 ते 30 मिनिटे अगोदर पाणी पिल्यामुळे आपल्याला जेवण ही कमी जाते.

4/4
जर तुम्ही व्यायाम करत असाल तर 15 मिनिटे आधी 1 ग्लास पाणी प्या. त्यामुळे एनर्जी लेव्हल वाढेल आणि व्यायाम केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी 2 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहते.

Published On - 10:06 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI