AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर, पाणी आणि हाहा:कार, महाराष्ट्रातील पावसाचे 10 विदारक फोटो जे पाहिल्यावर तुमच्या अंगावर येईल काटा

गेल्या काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी, वसई-विरार, पुणे, कल्याण आणि इतर अनेक भागांमध्ये अजूनही गंभीर परिस्थिती आहे. अनेक रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत, तर बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

| Updated on: Aug 20, 2025 | 2:42 PM
Share
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईत पावसाने थोडी उसंत घेतली असली, तरी राज्यातील इतर भागांमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर आहे.

1 / 10
मुंबईत गेल्या तीन दिवसांच्या संततधार पावसानंतर आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात केवळ रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2 / 10
मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्याने रस्ते, रेल्वे, आणि हवाई वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मिठी नदीची पाणी पातळीही कमी झाल्यामुळे क्रांतीनगर भागातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

3 / 10
मुंबई महापालिकेने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदत किंवा अधिकृत माहितीसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

4 / 10
हवामान विभागाने मुंबई शहर, उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

5 / 10
मुंबईला दिलासा मिळाला असला तरी वसई-विरारमध्ये मात्र अजूनही परिस्थिती गंभीर आहे. सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरू असल्यामुळे अनेक सोसायट्या आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

6 / 10
नालासोपारा, वसई, आणि विरारमधील पूर्व आणि पश्चिम दोन्ही भाग पाण्याखाली आहेत. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात दुपारपर्यंत कंबरेइतके पाणी साचले होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

7 / 10
पुण्यात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे एकता नगर परिसरात पाणी शिरले असून, काही घरांमध्ये पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्यात गुंतले असून, स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

8 / 10
कल्याण शहराला उल्हास, काळु, आणि वालधूनी नद्यांच्या पुराचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरले असून, शहाड पुलाखाली पाणी साचल्याने कल्याण-टिटवाळा मार्ग बंद झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने, महापालिकेने ९५० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

9 / 10
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पाऊस नसला तरी, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज तालुक्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीत, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

10 / 10
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.