PHOTO | संक्रांतीचा गोडवा, ‘अग्गंबाई सासूबाई’च्या सेटवर रंगणार ‘पतंगबाजी’ची स्पर्धा!

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत लवकरच आसावरी आणि अभिजित यांची पहिली संक्रांत साजरी होणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:10 PM, 12 Jan 2021
आई, सून, सासू आणि बायको अशी प्रत्येक भूमिका चोख बजावणारी ‘आसावरी’ महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली.
एकंदरीत काय तर 'सासूबाई' प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत, असं म्हंटल तरी खोटं ठरणार नाही.
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत लवकरच आसावरी आणि अभिजित यांची पहिली संक्रांत साजरी होणार आहे.
संक्रांत स्पेशल भागाचे खास चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे.
हलव्याचे दागिने घालून नटलेली ‘आसावरी’ या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
वेगळ्या रुपातल्या आसावरीला पाहून अभिजीत राजे देखील आश्चर्यचकित झाले होते.
मकर संक्रांतीनिमित्ताने अभिजीत-आसावरीच्या चाळीत पतंग उडवण्याची स्पर्धा लागणार आहे. सगळे या स्पर्धेत उत्साहाने सामील होणार आहेत.