मध्य रेल्वेवर मुंबई रेल्वे विकास महामंडळ प्रसन्न, या स्थानकात इतके सरकते जिने उभारणार..

मुंबई - ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला प्रवाशांना रेल्वे स्थानकातील पादचारी पुल चढताना आणि उतरताना बराच त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून सुटका करण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्ट बसवण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे. घाटकोपर स्थानकात महामंडळाने दोन नव्या सरकत्या जिन्यांचे उद्घाटन केले आहे. तर पाहूयात मुंबई रेल्वे विकास महामंडळाची नेमकी काय योजना आहे.

| Updated on: Jul 04, 2024 | 1:17 PM
सरकते जिन्यांची गरज हल्ली वाढत चालली आहे. पूर्वी केवळ मॉल आणि विमानतळ अशा ठिकाणी आढळणारे सरकते जिने हल्ली रेल्वे स्थानकात देखील बसविले जात आहेत. परंतू हे सरकते जिने दहा वर्षांपूर्वी  रेल्वे स्थानकात अभावानेच आढळायचे

1 / 5
मध्य रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड ( प्रभादेवी ) स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे रेल्वे स्थानकातील पादचारी पुल आणि सरकते जिने तसेच लिफ्टची संख्या अपुरी असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या ध्यानात आले. यंदा मुंबई रेल्वे विकास महामंडळाची  दिघे गाव 2, खाररोड 1, मीरारोड 1, अशा चार रेल्वे स्थानकात लिफ्ट देखील बसविण्याची योजना आहे.

2 / 5
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर स्थानकातील पादचारी पूलाचा समावेश स्थानकातील अनिवार्य बाबींमध्ये करण्यात आला. त्यानंतर पुल आणि सरकते जिने तसेच लिफ्ट उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वन देखील कनेक्टेट असल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती असते.

3 / 5
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मध्य रेल्वेच्या गर्दीचे स्थानक असलेल्या घाटकोपर स्थानकात एकूण  सहा सरकते जिने बसविण्याची योजना आखली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने गेल्यावर्षी 2023 मध्ये दिघे गाव 6, माहीम जंक्शन 1, खाररोड 2, असे नऊ सरकते जिने बसविले होते. तर यंदा 2024 मध्ये घाटकोपर 2, खाररोड 2, मीरोरोड 1 असे पाच सरकते जिने बसवण्याचा प्लान आहे.

4 / 5
घाटकोपर रेल्वे स्थानकातील सहा पैकी दोन सरकते जिने बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. घाटकोपर पूर्व दिशेला सर्क्युलेटींग एरीयात हे दोन सरकते जिने बसविले असून जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्याचे काल उद्घाटन झाले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.