AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : ‘शांततेत बोलण्याची सवय कर’; देवेंद्र फडणवीसांना नाना पाटेकरांनी दिलेला सल्ला, उदय सामंत यांना तर छातीत धडधडच व्हायची

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावाच्या आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांनी सांगितलेले नानांच्या परखड स्वभावाचे किस्से. काय आहेत ते किस्से जाणून घ्या.

| Updated on: Oct 09, 2026 | 2:22 PM
Share
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर आपल्या परखड आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठीही ओळखले जात होते. राजकारण्यांशी मैत्रीचे संबंध असतानाही त्यांच्या चुका सांगण्यास ते कधीच मागे हटले नाहीत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या याच बेधडक स्वभावाच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

1 / 6
नाना पाटेकर यांचे अनेक राजकारण्यांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध होते. मात्र, आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, हे ते नेहमी स्पष्टपणे सांगत. नाम फाउंडेशनच्या सामाजिक कामासाठी सर्वच पक्षांनी मदत केल्याचा उल्लेख करत त्यांनी राजकारणापलीकडील नात्यांना महत्त्व दिले.

2 / 6
नाम फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात नानांनी राजकारणाच्या घसरत्या स्तरावर थेट भाष्य केले होते. ‘सत्ताधारी आणि विरोधकांचे नाते दात आणि जिभेसारखे आहे,’ असे सांगत त्यांनी दोन्ही बाजूंनी संयम आणि सभ्यता राखण्याचा सल्ला दिला होता. चुकीचे घडत असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जबाबदारी विरोधकांची असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

3 / 6
नानांचा स्पष्टवक्तेपणा केवळ व्यासपीठापुरता मर्यादित नव्हता. देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात नानांच्या आठवणी सांगताना, भाषणानंतर काही मिनिटांतच त्यांचा फोन यायचा, असे सांगितले होते. ‘एवढ्या मोठ्याने भाषण का करतोस? शांततेत बोलण्याची सवय कर,’ असा सल्ला नाना देत असत. त्यांच्या या सूचनेमुळे आपल्या भाषणाची शैली बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते.

4 / 6
उदय सामंत यांनीही नानांच्या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव सांगितला होता. नानांच्या कार्यक्रमाला जाताना छातीत धडधडते, कारण काम करताना त्यांचा वचक असतो, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. मात्र, या वचकामागे नानांविषयीचा आदरही तितकाच मोठा होता. नानांना ‘नाना’ म्हणूनच संबोधावे, असा त्यांचा आग्रह असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

5 / 6
नाना पाटेकरांसाठी सामाजिक कामातून मिळणारे समाधान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते. आपल्या कामामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आले, ही जाणीव आपल्याला रात्री शांत झोप देते, असे ते सांगत. मैत्री जपायची, पण चुकीवर स्पष्ट बोलायचे आणि संवादातील सभ्यता कधीही सोडायची नाही, हीच नानांची भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख ठरली.

6 / 6
Follow Us
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...