AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्विस्ट; लीलाच्या मंगळागौरीत विक्रांतचं सत्य येणार समोर

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होते. या मालिकेत वल्लरी विराज आणि राकेश बापट हे मुख्य भूमिका साकारत आहेत. मार्च महिन्यात सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

| Updated on: Aug 05, 2024 | 11:55 AM
Share
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीलाची पहिली  मंगळागौर साजरी होणार आहे. जहागीरदार घरातल्या सूना आणि नातंसुनांनी त्याची जोरात तयारी केली आहे. सगळ्याजणी नऊवारी नेसून आणि दागिने घालून छान तयार झाल्या आहेत.

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीलाची पहिली मंगळागौर साजरी होणार आहे. जहागीरदार घरातल्या सूना आणि नातंसुनांनी त्याची जोरात तयारी केली आहे. सगळ्याजणी नऊवारी नेसून आणि दागिने घालून छान तयार झाल्या आहेत.

1 / 6
पण या मंगळागौरीत फक्त खेळ नाही तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांतचंही सत्य सर्वांसमोर येणार आहे. लीलाच्या मंगळागौरीत लीलासमोर विक्रांतचं सगळं सत्य समोर येतं आणि हे पूजाला म्हणजेच विक्रांतच्या बायकोलादेखील कळतं.

2 / 6
ती लीलाची माफी मागते. पण पूजा लीलाकडून विक्रांतसोबत बोलायला थोडा वेळ मागून घेते. इकडे मंगळागौरीत लीला आणि तीन सुनांचं जंगी भांडण होतं. त्यामुळे सरोजिनी आई हा कलह थांबवण्यासाठी लीला आणि एजेला देवदर्शनाला पाठवते.

3 / 6
देवदर्शनाला जात असताना किशोर लीलावर हल्ला करतो. लीलाचा जीव धोक्यात असल्याने एजेचा जीव कासावीस होतो. एजे-लीला घरी आल्यानंतर पूजा आणि विक्रांत सगळं सांगण्यासाठी लीलाला बाहेर बोलवतात.

देवदर्शनाला जात असताना किशोर लीलावर हल्ला करतो. लीलाचा जीव धोक्यात असल्याने एजेचा जीव कासावीस होतो. एजे-लीला घरी आल्यानंतर पूजा आणि विक्रांत सगळं सांगण्यासाठी लीलाला बाहेर बोलवतात.

4 / 6
पण एजे विक्रांतला सगळ्यांसमोर दोषी ठरवतो आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. लीलाची खात्री झाली आहे की एजे निर्दोष आहे आणि तिचं चुकलं आहे. अपमानाने खवळलेला विक्रांत हा पूजा आणि लीलाला मारायचं ठरवतो.

पण एजे विक्रांतला सगळ्यांसमोर दोषी ठरवतो आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. लीलाची खात्री झाली आहे की एजे निर्दोष आहे आणि तिचं चुकलं आहे. अपमानाने खवळलेला विक्रांत हा पूजा आणि लीलाला मारायचं ठरवतो.

5 / 6
लीलाचा जीव पुन्हा धोक्यात असताना यावेळीही एजे ऐनवेळी पोहोचून लीलाचा जीव वाचवू शकेल का? लीलाची  पहिली  मंगळागौर कशी साजरी होईल? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

लीलाचा जीव पुन्हा धोक्यात असताना यावेळीही एजे ऐनवेळी पोहोचून लीलाचा जीव वाचवू शकेल का? लीलाची पहिली मंगळागौर कशी साजरी होईल? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

6 / 6
Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना