Smallest Airports : कुठं समुद्रकिनारी, तर कुठं डोंगरावरून विमान उडतात, ‘हे’ आहेत जगातील 5 सर्वात लहान विमानतळ

जगात अशीही काही विमानतळं आहेत जे पाहून आपल्या डोक्यातील विमानतळांविषयीची प्रतिमा बदलेल. यातील काही विमानतळं समुद्रकिनारी आहेत, तर काही थेट डोंगरावर. जगातील अशाच 5 सर्वात लहान विमानतळांचा हा आढावा.

1/6
विमानतळ म्हटलं की भव्य अशी धावपट्टी आणि त्याच्या अवतीभवती प्रवाशांच्या विविध सुविधांचा लवाजमा असलेला विस्तीर्भ भाग डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र, जगात अशीही काही विमानतळं आहेत जे पाहून आपल्या डोक्यातील विमानतळांविषयीची ही प्रतिमा बदलेल. ही विमानतळं म्हणजे केवळ विमानाची धावपट्टी अशी स्थिती आहे. यातील काही विमानतळं समुद्रकिनारी आहेत, तर काही थेट डोंगरावर. जगातील अशाच 5 सर्वात लहान विमानतळांचा हा आढावा.

2/6
नेदरलँडच्या मालकीच्या कॅरेबियाई बेट सबामध्ये जुआनचो ई. यरोस्किन एअरपोर्ट (Juancho Yrausquin Airport) आहे. या विमानतळावर जगातील सर्वात लहान व्यापारी विमानतळ धावपट्टी आहे. ही धावपट्टी केवळ 400 मीटर आहे. ही लांबी सर्वसामान्य विमानाच्या लांबीपेक्षा केवळ थोडीशी मोठी आहे. त्यामुळेच या विमानतळावर मोठ्या विमानांना प्रवेश नाही. विंडएअर या एकमेव विमान कंपनीची विमानं या धावपट्टीवरुन उड्डान करतात.

3/6
किंग्डम ऑफ लेसोथ पूर्णपणे दक्षिण आफ्रीकेने घेरलेला आहे. येथे मोशोशू आय एअरपोर्ट (Moshoeshoe I airport) हे एकमेव विमानतळ आहे. या आंतरराष्ट्रीय विमातनळावरुन जोहान्सबर्गसाठी विमानं सुटतात. याची धावपट्टी केवळ 1000 मीटर आहे.

4/6
स्कॉटलँडमधील बर्राचं ट्रॅघ मोहर विमानतळाची (Barra Airport) धावपट्टी जगातील एकमेव सुमुद्री धावपट्टी आहे. हे विमानतळ सोमवार से शुक्रवार काही तासांसाठी सुरू असतं. कारण या भागात हवामानात मोठे बदल होत असतात. त्याप्रमाणे विमान उड्डानाचं नियोजन केलं जातं.

5/6
मॉर्गनटाऊन म्यूनसिपल एअरपोर्ट (Morgantown Municipal Airport) हे विमानतळ युनायटेड एअरलायन्सकडून संचालित केलं जातं. हे विमानतळ शहराला क्लार्क्सबर्ग आणि वाशिंग्टन डीसीमधील वाशिंग्टन डलेस इंटरनॅशनल एअरपोर्ट जोडते. या विमानतळाचा रनवे केवळ अर्धा मैल आहे. रेस्तरांमध्ये बसून कोणतीही व्यक्ती या विमानतळावरील उड्डान पाहू शकते.

6/6
नेपामधील लुक्लामध्ये तेनजिंग-हिलेरी एअरपोर्ट (Tenzing-Hillary Airport) आहे. याचा उपयोग बहुतांशवेळा पर्यटकांकडून माउंट एवरेस्टवर ट्रेकिंगच्या सुरुवातीला केला जातो. हे विमानतळ ठिकाण आणि धावपट्टी यामुळे सर्वात लहान विमानतळांच्या यादीत आहे. या धावपट्टीवरुन विमान चालवणं वैमानिकांसाठी मोठं आव्हान असतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI