भाजप आमदार कालिदास कोळंबकर (BJP MLA Kalidas Kolambakar) यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली.
1 / 5
या स्पर्धेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फलंदाजीत हात आजमावला. एखादा बॉल हुकला, मात्र फडणवीसांनी बोलिंगवर जोरदार टोलेबाजी केली.
2 / 5
या सामन्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना मीडियाने गाठलं. देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेटमधील फटकेबाजीला जोडून सध्याच्या राजकीय फटकेबाजीबद्दल विचारलं.
3 / 5
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "क्रिकेट खेळताना मजा येते, त्यात बॅटिंग करायला आणखी मजा येते. मी बॉडीलाईन बोलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल ऑन द स्टम्प बोलिंग करतो आणि माझा शॉर्टपिचही बॉल नसतो. योग्य टाकत असतो.
4 / 5
समोरच्यांना बॅटिंग करताना, तो बॉल खेळताना अडचण होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.