शेतकऱ्यांच्या नुकसानाचं तातडीनं सर्वेक्षण करा, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची थेट बांधावर जाऊन पाहणी, पीक विमा कंपनीवरही कारवाईचे आदेश

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून अमरावती जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी त्यांनी केलीय.

1/5
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. नदी -नाल्यांना पूर आल्याने शेती खरडून गेलीय. अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून अमरावती जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेती बांधावर जाऊन  नुकसानीची पाहणी त्यांनी केलीय

2/5
तातडीने सर्वांचे सर्वेक्षण करा असे निर्देश प्रशासना दिलेत, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधत शेतकऱ्यांची विचारपूस केली.सरकार तुमच्या पाठीशी आहे, नुकसान झालेल्याना भरपाई मिळणार असं आश्वासन अमरावतीच्या शेतकऱ्यांना यावेळी कृषी मंत्र्यांनी दिलंय.

3/5
पीक विमा मिळण्यासाठी कंपनीच्या  प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना टाळाटाळ कऱण्यात येत होती,कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना चांगली वागणूक,सविस्तर माहिती देण्याचे टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी होत्या.

4/5
दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत स्वतः इफकोटोकियो या  विमा कंपनी मध्ये अचानक भेट दिली तपासणी केली यावेळी कार्यालयात आवश्यक कार्यवाहीसाठी यंत्रणा आढळली नाही.

5/5
त्याचप्रमाणे, शेतकरी बांधवांना विमा प्राप्त होण्यासाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. तर उपस्थित प्रतिनिधीकडून समाधानकारक उत्तर मंत्री महोदयांना मिळाले नाही  त्यामुळे या कंपनीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI