AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारची मुलगी, जबरदस्ती झाली नायिका! अकाउंटंट होण्याचे होते स्वप्न

बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे तिचे वडील सुपरस्टार होते. पण तिला कधीही अभिनयक्षेत्रात पाऊल टाकायचे नव्हते. पण तिला दबावाखाली चित्रपटांमध्ये काम करावे लागले. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

| Updated on: Nov 04, 2025 | 6:12 PM
Share
बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्सनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यापैकी काहींवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले, तर काहींना पूर्णपणे नाकारले. खुशी कपूर, जुनैद खान, इब्राहिम अली खान यांच्यासह अनेक स्टारकिड्सनी गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बहुतेक स्टारकिड्स आपल्या पालकांसारखेच स्टार होऊन चमकण्याचे स्वप्न पाहतात, पण बॉलिवूडमध्ये अशी एक नायिकाही झाली जिला सुपरस्टारची मुलगी असूनही चित्रपटांमध्ये रस नव्हता. आम्ही जिच्याविषयी बोलत आहोत ती आहे ट्विंकल खन्ना. तिने स्वतः याबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

1 / 5
ट्विंकल खन्नाने १९९५ मध्ये 'बरसात' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि प्रेक्षकांना खूप आवडला. मात्र, ट्विंकलच्या नंतरच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. २००१ मध्ये आलेल्या 'लव के लिए कुछ भी करेगा' या चित्रपटानंतर तिने अंतर ठेवण्यास सुरुवात केली. ट्विंकल सध्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल'मुळे चर्चेत आहे. हा एक चॅट शो आहे. या शोमध्ये ती काजोलसोबत दिसत आहेत.

2 / 5
ट्विंकल खन्नाने ट्वीक इंडियासाठी करीना कपूरशी बोलताना उघड केले की तिला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. दबावाखाली येऊन तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  'मला खरंच कधीच अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. ती माझी मजबुरी होती, कारण माझी आई एकटी होती आणि तिने एकट्याने सर्वांचा खर्च उचलला होता' असे ट्विंकल म्हणाली.

3 / 5
पुढे ती म्हणाली, 'मी अभिनेत्री होण्याबद्दल कधी विचार केला नव्हता. मला तर अकाउंटंट व्हायचे होते. मी लहानपणापासूनच अभिनेत्यांमध्ये वाढले, पण प्रसिद्धीची कधीच भूक नव्हती. मला प्रसिद्धीकडे जायचे नव्हते, प्रसिद्धी माझ्याकडे स्वतः आली.'

4 / 5
ट्विंकल खन्नाने कबूल केले की तिला वडील राजेश खन्ना आणि आई डिंपल कपाडिया यांच्या स्टारडमने तिच्या कारकिर्दीत खूप मदत केली. 'माझ्यासोबत ड्रामा करण्यापूर्वी लोक दोनदा विचार करत. मला पहिला ब्रेक सहज मिळाला, पण त्यानंतर स्वतःच्या कारकिर्दीवर काम करावे लागते' असे ट्विंकल म्हणाली.

5 / 5
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...