Pandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा

अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊन वाऱ्याची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेलाय , सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळशीवाल्या महिला, वारकरी, पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगण सोहळा पार पडला.

Jul 02, 2022 | 6:47 PM
राहुल ढवळे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jul 02, 2022 | 6:47 PM

विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढऱ्या शुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले. उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज इंदापूर शहरातील सौ कस्तुरा बाई श्रीपती कदम या विद्यालयात  अश्वांचे गोल रिंगण पार पडले,  रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

1 / 6
 अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊनची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी  पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघाले  ,   सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळशीवाल्या महिला, वारकरी,  पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगण सोहळा पार पडला.

2 / 6
पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा निमगाव केतकी येथील मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाला सकाळी 11,30 वाजता रिंगण सुरू झाले .

3 / 6
पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला.  सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली.

4 / 6
यानंतर विठू नामाचा गजर करीत वारकरी  खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला  वारकरी  धावल्या.,नंतर विणोकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला.

5 / 6
दिंड्यानी

दिंड्यानी

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें