भारतात चहाचे चाहते सर्वदूर पसरलेले आहेत. अनेकांसाठी चहा हा केवळ एक पेय नव्हे, तर ती एक भावना आहे. सकाळची सुरुवात असो किंवा दिवसाचे कोणतेही सत्र काहींना चहाशिवाय चैन पडत नाही. प्रत्येकाची चव निराळी असते.
1 / 8
त्यानुसार चहा बनवण्याच्या पद्धतीही बदलतात. काहींना सौम्य चहा आवडतो, तर काहींना गोड आणि कडक चहा आवडतो. मात्र, चहाची खरी चव अनेकदा तो बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. या प्रक्रियेत दूध महत्त्वाची भूमिका बजावते.
2 / 8
दूध चहाला केवळ रंग, टेक्सचर आणि चव देत नाही, तर ते चहाचा संपूर्ण अनुभव बदलून टाकते. आपल्या घरी चहा बनवताना, बहुतांश लोक उकळलेले कोमट दूध वापरतात.
3 / 8
याउलट, चहाची दुकाने आणि स्टॉल्सवर अनेकदा दूध न उकळता चहा बनवला जातो. मग चहाला अधिक चविष्ट बनवण्यासाठी कच्चे की उकळलेले कोणते दूध घालावे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
4 / 8
चहा बनवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे दूध वापरता, याचा त्याच्या चवीवर मोठा परिणाम होतो. सध्याच्या काळात, लोक सहसा पॅकेज केलेले म्हणजेच पाश्चराइज्ड (Pasteurized) दूध वापरतात, जे आधीच तापवलेले असते.
5 / 8
तथापि, हे दूध घरी आल्यावर गृहिणी ते पुन्हा उकळतात आणि अनेकदा त्यात पाणीही मिसळतात. पॅकेज केलेले दूध दोनदा गरम केल्याने त्याचा मूळ पोत (टेक्सचर) खराब होतो. पाणी मिसळल्यामुळे दूध अधिक पातळ होते.
6 / 8
यामुळे, अनेक चहा तज्ज्ञांच्या मते, चहासाठी उकळलेले (शिजवलेले) दूध वापरणे चहाचा मूळ आणि समृद्ध पोत बिघडवू शकते.
7 / 8
अनेक चहाचे स्टॉल्स दूध न उकळता थेट चहात वापरतात. ज्यामुळे चहा अधिक क्रेमी आणि चविष्ट वाटू शकतो. त्यामुळे चहाप्रेमी असा चहा पिणं पसंत करतात.