AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारंगखेडा यात्रेत आला व्हाईट कोब्रा अन् थेट…; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

महाराष्ट्रातील प्रसिद्ध सारंगखेडा चेतक महोत्सवात पंजाबचा १५ वेळा विजेता ‘व्हाईट कोब्रा’ हा सुपरस्टार घोडा दाखल झाला आहे. ६५ इंच उंचीचा हा देखणा नुक्रा जातीचा घोडा बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Updated on: Dec 07, 2025 | 2:19 PM
Share
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ऐतिहासिक सारंगखेडा अश्व बाजाराला चेतक महोत्सव म्हणूनही ओळखले जाते. यंदा या ठिकाणी एक खास आकर्षण पाहायला मिळत आहे. देशातील कानाकोपऱ्यांतून होणाऱ्या अश्व स्पर्धांमध्ये तब्बल १५ वेळेस विजेता ठरलेल्या पंजाबचे जगतारा सिंग यांचा व्हाईट कोब्रा घोडा प्रथमच या बाजारात दाखल झाला आहे.

1 / 8
व्हाईट कोब्रा हा नुसता घोडा नसून, तो देशाच्या अश्वविश्वातील एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. व्हाईट कोब्राने आतापर्यंत देशातील विविध भागांमध्ये आयोजित केलेल्या घोड्यांच्या स्पर्धांमध्ये तब्बल १५ वेळेस विजेतेपद पटकावले आहे. त्याने जिंदाल लुधियाना, भटिंडा आणि हनुमान गड येथील नामांकित अश्व स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले आहे.

2 / 8
हा घोडा नुकरा जातीचा असून त्याचा रंग पांढराशुभ्र आणि रूप अत्यंत रुबाबदार आहे. ६५ इंच उंचीचा हा घोडा आपल्या बांधणीमुळे आणि देखणेपणामुळे सतत चर्चेत असतो. हा घोडा बाजारात दाखल होताच आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

3 / 8
त्याची रुबाबदार चाल आणि देहबोली पाहण्यासाठी अश्वप्रेमींची सतत गर्दी होत आहे. व्हाईट कोब्राचे वय 7 वर्षे आहे, जो स्पर्धेसाठी अत्यंत योग्य मानला जातो. या अत्यंत मौल्यवान घोड्याची देखभाल करण्यासाठी सहा ते सात लोकांची टीम नेहमी तैनात असते.

4 / 8
व्हाईट कोब्राची देखरेख एका व्हीआयपीप्रमाणे केली जाते. त्याच्या देखभालीसाठी ६ ते ७ लोकांची विशेष टीम २४ तास तैनात असते. त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी त्याच्या आहारावर विशेष लक्ष दिले जाते.

5 / 8
त्याला दररोज हरभरे, शुद्ध तूप, दूध, बाजरी, मका आणि इतर पोषक घटक असलेला उच्च प्रतीचा आहार दिला जातो. या विशेष खुराकामुळेच त्याची ऊर्जा आणि तंदुरुस्ती स्पर्धेसाठी उच्च स्तरावर टिकून राहते.

6 / 8
सारंगखेडाचा चेतक महोत्सव हा घोड्यांच्या खरेदी-विक्रीसह, त्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहे. देशभरातील सर्वोत्कृष्ट, जातिवंत आणि कोट्यवधी रुपयांचे घोडे या बाजारात दाखल होत असतात.

7 / 8
व्हाईट कोब्रा पहिल्यांदाच सारंगखेडाच्या स्पर्धेत उतरत असल्याने त्याला येथील वातावरणाचा आणि स्थानिक स्पर्धकांचा सामना करावा लागणार आहे. पंजाबमधून आलेल्या या १५ वेळा विजेत्या घोड्याने महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या अश्व बाजारातही विजेतेपद मिळवून आपला दबदबा कायम राखल्यास ते एक मोठे यश ठरणार आहे.

8 / 8
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.