PHOTO | सरोगेसीद्वारे झालेला किंग खानच्या लेकाचा जन्म, ‘या’ चित्रपटातही झळकलाय चिमुकला अबराम खान!

बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरीचा लाडका लेक अबराम खान (AbRam Khan) आज (27 मे 2021) 8 वर्षांचा झाला आहे. लॉकडाऊनमुळे तो आपला वाढदिवस कुटुंबासमवेत घरीच साजरा करणार आहे. अबरामचा जन्म सेरोगेसीच्या माध्यमातून 2013 मध्ये झाला होता.

1/7

2/7
लहानपणापासूनच अबराम खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोईंग देखील जबरदस्त आहे. आयपीएल सामना असो वा वाढदिवसाची पार्टी, अबरामला शाहरुखबरोबर बर्‍याचदा अनेक इव्हेंटमध्ये स्पॉट केले जाते. अबराम हा त्याच्या वडिलांची कार्बन कॉपी आहे.
3/7
अबरामला मोठा भाऊ आर्यन खान आणि बहीण सुहाना खान देखील आहेत. ते दोघेही अबरामवर खूप प्रेम करतात आणि लहान अबरामबरोबर फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असतात.
4/7
शाहरुखचे चाहते त्याच्या मुलांना बॉलिवूडमध्ये पाहण्यास खूप उत्सुक आहेत. पण, त्याचा धाकटा मुलगा अबराम याने वयाच्या अवघ्या पहिल्या वर्षीच बॉलिवूडमध्ये एक कॅमिओ केला आहे.
5/7
अबराम खान शाहरुख सोबत त्याच्या ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात दिसला होता.
6/7
अबराम मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकतो.
7/7
शाहरुखचे त्याच्या चिमुकल्या लेकावर खूप प्रेम आहे. शाहरुख आणि अबराम यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग होते.