Photo : ‘मातीतल्या माणसांच्या, शेतीच्या गप्पा’, सोलापूरच्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे भरभरुन बोलले!

1/5
शरद पवारांनी मला शेतीचं वेड लावलं. मला शेती घ्यायला लावली. शेतीवर प्रेम करायला शिकवलं. आधी माझ्याकडे 12 एकर शेती होती. परंतु नंतर शेतीचं वेडं लागल्यावर शेती वाढवली. आता माझ्याकडे 34 एकर शेती आहे, असं त्यांनी सांगितलं.

2/5
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील कृषीभूषण श्री दत्तात्रय नानासाहेब काळे यांनी नविन विकसित केलेली "किंगबेरी" या द्राक्ष वाण असलेल्या बागेला पवारांनी भेट दिली. यावेळी पवारांसोबत सुशीलकुमार शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते उपस्थित होते.

3/5
शरद पवार एखाद्याला रेटायचे, पुढे घेऊन जायचे म्हटल्यावर त्यांचा याबाबतीत कुणीही हात धरु शकत नाही. माझ्यावर पवारसाहेबांचं प्रचंड प्रेम आहे.  आम्हा सगळ्यांना शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. पवारसाहेबांनी एकदा का मनावर घेतलं की ते बरोबर कार्यक्रम करतात, असंही ते म्हणाले.

4/5
ज्यांनी मला राजकारणात आणले त्यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीत बसता आलं, त्यांच्यासोबत काम करता आलं, त्याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पवारसाहेबांच्यात आणि माझ्यात ताटातूट  करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण आम्ही आमची मैत्री एवढी घट्ट होती की आमच्या नात्यात कधीच अंतर पडलं नाही, अशा आठणवी शिंदे यांनी जागवल्या.

5/5
शरद पवारांनी मला तिकीट दिले. तसंच तिकीट दिल्यानंतर मला निवडणुकीला 20 हजार रुपये देखील दिले होते. उरलेले 4 हजार रुपये मी त्यांना परत दिले होते. असे पवार दिलदार राजकारणी आहेत. शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे, असं सरतेशेवटी सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI