Shivtirth: राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा, ‘शिवतीर्थ’ फुलांनी सजला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. या चिमुकल्या पाहुण्याचं आज नामकरण सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त 'शिवतीर्थ' फुलांनी सजवण्यात आला आहे.

May 06, 2022 | 11:58 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 06, 2022 | 11:58 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. या चिमुकल्या पाहुण्याचं आज नामकरण सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त 'शिवतीर्थ' फुलांनी सजवण्यात आला आहे.

1 / 5
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. 5 एप्रिलला मुलाचा जन्म झाला असून आज पार पडणाऱ्या नामकरण सोहळ्यासाठी फक्त घरातीलच मोजके पाहुणे उपस्थित राहतील.

2 / 5
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांनी नातवाच्या आगमनानंतर कुटुंबात झालेल्या सकारात्मक बदलाविषयी सांगितलं. बाळाच्या जन्माची बातमी कळताच शर्मिला या उत्साहात ब्रीच कँडी रुग्णालयात अक्षरश: किंचाळल्या होत्या.

3 / 5
अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता, तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.

4 / 5
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचं 2019 मध्ये लग्न झालं. या लग्नसोहळ्याला राजकीय आणि कला क्षेत्रातील विविध नामांकित मंडळींनी हजेरी लावली होती.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें