सव्वादोन लाखांची मेंढी पाहिलीत का? माडग्याळ बाजारात सहा मेंढ्यांची 14 लाखांना विक्री

एका साध्या मेंढीची किंमतही लाखो रुपये असू शकते याचा कोणी विचारही केला नसेल, मात्र सांगलीच्या माडग्याळ बाजारात सहा मेंढ्यांची विक्री तब्बल 14 लाखांना झाली आहे. म्हणजेच एका मेंढीला सरासरी सव्वादोन लाखांहून अधिक दर मिळाला आहे. या मेंढ्यांची नेमकी अशी काय वैशिष्ट आहेत, ज्यामुळे त्यांना इतका दर मिळाला जाणून घेऊयात.

Jan 24, 2022 | 7:42 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 24, 2022 | 7:42 PM

एका साध्या मेंढीची किमतही लाखो रुपये असू शकते याचा कोणी विचारही केला नसेल, मात्र सांगलीच्या माडग्याळ बाजारात सहा मेंढ्यांची विक्री तब्बल 14 लाखांना झाली आहे. म्हणजेच एका मेंढीला सरासरी सव्वादोन लाखांहून अधिक दर मिळाला आहे.

1 / 5
 सांगलीचा माडग्याळ बाजार हा मेंढ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात विविध प्रजातीच्या मेंढ्या विक्रीसाठी येत असतात. मेंढ्या खरेदी करण्यासाठी इथे दूरवरून लोक येतात. जातीवंत मेंढ्यांसाठी हा बाजार ओळखला जातो.

2 / 5
जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याच्या सहा मेंढ्यांना तब्बल 14 लाखांची किंमत मिळाली आहे. एका मेंढीला दोन लाख 38 हजारांचा दर मिळाला आहे.

3 / 5
या मेंढीचे वैशिष्ट म्हणजे ही मेंढी दिसण्यास अत्यंत रुबाबदार अशी आहे, या मेंढीच्या मांसाला विशिष्ट चव आणि स्वाद असतो. मांसासाठी या मेढीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो.

4 / 5
आपल्या मेंढ्यांना चांगला दर मिळाल्याने आनंदी झालेल्या माय्यप्पा यांनी आपल्या मेंढ्याची हालगीच्या तालावर मिरवणूक काढली. मेंढीपालनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत नाही. तसेच त्यातून मिळणारे उत्पादन देखील अधिक असते. त्यामुळे अनेकजण मेंढीपालनाकडे वळत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें