PHOTO : रुबीना दिलैकचं खास फोटोशूट, पण लोक म्हणाले पत्ता कोबी!

रुबिनाने एका ग्रीन आउटफिटमध्ये हे फोटोशूट केलं आहे. त्याचबरोबर तिने डोक्यावर फुलांची एक खास स्टाईलही केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:45 PM, 12 Apr 2021
1/5
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही बिग बॉस 14 ची विजेती ठरल्यानंतर कायम चर्चेत आहे. रुबिना सध्या आपल्या नव्या फोटोनशूटमुळे चर्चेत आलीय. रुबिनाने यावेळी काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. पण तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
2/5
रुबिनाने ग्रीन आऊटफिटमध्ये फोटोशूट केलंय. त्याचबरोबर डोक्यावर खास अंदाजात फुलांची एक स्टाईल केलीय.
3/5
रुबिनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहेत. पण काही लोक तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. काही युजर्सनी तर रुबिना पत्ता कोबीसारखी दिसत असल्याचं म्हटलंय. अशाप्रकारे अनेक यूजर्सनी रुबिनाच्या या फोटोंवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
4/5
यापूर्वी रुबिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केली होती. ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये आपल्या जलवा दाखवताना पाहायला मिळाली. फोटो शेअर करताना रुबिनाने तिचा पती अभिनव शुक्लाने हा फोटो काढल्याचं सांगितलं.
5/5
रुबिनाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर बिग बॉस 14 ची विजेती ठरल्यानंतर ती लोकप्रिय मालिका 'शक्ती'चा एक भाग बनली आहे. या मालिकेत आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. सोम्याचा हरमनने आता मालिकेत पुनरागमन केलं आहे. या मालिकेत हरमनचं पात्र अभिनेता सिजेन खान करतोय.