AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला बसला धक्का, स्टार खेळाडू स्पर्धेतून बाद!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर पाकिस्तान आणि दुबईत होत आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून 9 मार्चपार्यंत असणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वीच ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. कारण स्टार अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना बदली खेळाडूसाठी धावाधाव सुरु झाली आहे.

| Updated on: Feb 01, 2025 | 4:12 PM
Share
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेतून स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श बाद झाला आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान पाठदुखीचा त्रास झाला होता. पण या दुखापतीतून मार्श अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे त्याचं स्पर्धेत खेळणं कठीण झालं आहे.

1 / 5
पाठदुखीच्या त्रासामुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नाही. आता वैद्यकीय अहवालानुसार मिचेल मार्श चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नाही.  त्यामुळे मार्शने चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 5
ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात मिचेल मार्शचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र आता पाठदुखीच्या त्रासामुळे स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी अष्टपैलू खेळाडू निवडावा लागणार आहे.

3 / 5
कॅमरून ग्रीनही दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली नव्हती. पण ग्रीन बरा झाला तर त्याला मार्शऐवजी संघात स्थान मिळू शकते. अन्यथा वेबस्टरची वनडे संघात निवड होण्याची शक्यता आहे. वेबस्टरने भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली होती.

4 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), एलेक्स कॅरी, नॅथन एलिस, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा .

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार