PHOTO: नीरजवर अजूनही होत आहे बक्षिसांचा वर्षाव, महिंद्रांनी दिलेली खास कार पाहाच!

भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकवून देत नीरज चोप्राने इतिहास रचला. ज्यानंतर त्याच आयुष्यच बदलून गेलं आहे. त्याच्यावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव अजूनपर्यंत सुरु आहे.

1/5
भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. त्याने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत हे सुवर्णपदक मिळवलं. तब्बल 100 वर्षांत एथलेटिक्समध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक असल्याने नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत असून अजूनही हा वर्षाव होतचं आहे.

2/5
नीरजच्या या कामगिरीसाठी आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्सने त्याचा नुकताच 
नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात सन्मान केला. त्यांना त्याला एक कोटी रुपयांसह एक खास जर्सी दिली. ज्यावर 8758 असं लिहिलं होतं. नीरजला सुवर्णपदक मिळवून देणारा थ्रो 87.58 मीटरचा असल्यानेच या नंबरची जर्सी त्याला देण्यात आली आहे.
नीरजच्या या कामगिरीसाठी आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्सने त्याचा नुकताच नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात सन्मान केला. त्यांना त्याला एक कोटी रुपयांसह एक खास जर्सी दिली. ज्यावर 8758 असं लिहिलं होतं. नीरजला सुवर्णपदक मिळवून देणारा थ्रो 87.58 मीटरचा असल्यानेच या नंबरची जर्सी त्याला देण्यात आली आहे.
3/5
य़ाआधी शनिवारी (30 ऑक्टोबर) महिंद्रा ग्रुपने XUV7000 या कारचं स्पेशल गोल्डन एडिशन नीरजला भेट म्हणून दिलं होतं. या गाडीवर सुवर्ण रंगात भाला फेकपटू असून तिथे 87.58 असंही लिहिलं आहे.

4/5
त्याआधी शुक्रवारी नीरज उदयपुर येथे होता. तिथे यूनिट चार राजपुताना रायफल्सच्या दिग्गजांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत नीरजने भेट घेतली.  यावेळीही नीरजचा खास सन्मान करण्यात आला. यावेळी उदयपुर मिलिट्री स्टेशच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं नाव बदलून नीरज चोप्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं देण्यात आलं.

5/5
तर काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार नीरजचं नाव यंदा खेलरत्न जाहीर झालेल्या 11 खेळाडूंमध्ये देखील आहे. त्यामुळे लवकरच त्याला या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI