Marathi News » Photo gallery » Sports photos » England tour is dangerous for indian cricketers sreesanth pravin kumar pankaj singh rp singh dinesh karthik career distroyed
इंग्लंडचा दौरा म्हणजे Danger Zone,’या’ भारतीय क्रिकटपटूंची कारकिर्द आली संपुष्टात, यंदा युवा खेळाडूंवर टांगती तलवार
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये असून 18 जूनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि नंतर इंग्लंड संघासोबत कसोटी मालिका खेळणार आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर कारकिर्द संपलेल्या खेळाडूंमध्ये पहिलं नाव येतं वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारचं. 2011 सालीच्या इंग्लंड दौऱ्यात असणाऱ्या प्रवीणने 3 कसोटी सामन्यांत 15 विकेट घेतले होते.
दौऱ्यात त्याची कामगिरी उत्तम होती. लॉर्डसवर त्याने पाच विकेटही घेतल्या. पण सोबतच इंग्लंडच्या फलंदाजानी त्याला बरेच रन ठोकल्याने हा त्याचा शेवटचा दौरा ठरला. त्यानंतर तो
भारताकडून एकही कसोटी खेळला नाही.
2 / 6
भारताचा आणखी एक वेगवान गोलंदाज जो कायमच त्यांच्या अशांत क्रिकेटजीववनामुळे चर्चेत राहिला तो म्हणजे श्रीशांत. 2011 च्याच दौऱ्यात श्रीशांतही होता. त्याने
3 कसोटी सामन्यात 8 विकेट्स घेतल्या. दरम्यान संपूर्ण दौऱ्यात अत्यंत कमी विकेट घेतल्याने श्रीशांतही कसोटी संघातून बाहेर गेला. ज्यानंतर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये
अडकला आणि त्याची कारकिर्दच संपुष्टात आली.
3 / 6
इंग्लंडच्या 2011 च्याच दौऱ्यात आरपी सिंह देखील होता. ज्याने केवळ 1 टेस्ट मॅच खेळली. ज्यात त्याला एकही सफलता मिळाली नाही.
दौऱ्यावर नसतानाही झहीर खान दुखापतग्रस्त झाल्याने आरपीला बोलवले पण त्याने एकच टेस्ट मॅच खेळली ज्यात एकही विकेट न घेता तब्बल 118 रन दिले. ज्यानंतर त्याला
परत भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
4 / 6
2011 नंतर 2014 मध्ये भारतीय संघात होता गोलंदाज पंकज सिंह. ज्याने दोऱ्यात दोन सामन्यांत केवळ दोनच विकेट घेतले.
बऱ्याच प्रतिक्षेनंतर संघात आलेल्या पंकजने सलामीच्या सामन्यातच खराब गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणही खराब केले. ज्यामुळे केवळ दोन टेस्ट खेळवल्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघाकडून
खेळवण्यात आलं नाही.
5 / 6
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा नुकत्याच पार पडेलेल्या 2018 सालच्या दौऱ्यात भारतीय संघात होता. त्याने दोन कसोटी सामन्यातं केवळ
20 रन केले. बऱ्यांच वर्षापूर्वी टेस्टमध्ये पदार्पण करुनही कार्तिकच्या नावे केवळ 26 च टेस्ट मॅचेस आहेत.
त्यात 2018 च्या दौऱ्यात दोन टेस्टमधील 4 डावांत त्याने केवळ 26 रनच केल्याने अद्यापर्यंत त्याला संघात स्थान दिलं गेल नाही.