India vs England : सिराजची खुन्नस, कोहलीची आक्रमकता, टीम इंडियाच्या विजयाचे 8 फोटो

भारताने पाचव्या दिवशी इंग्लंडसमोर 60 षटकात 272 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताचा वेगवान तोफखाना मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी अक्षरश: आग ओकणारी गोलंदाजी केली.

| Updated on: Aug 17, 2021 | 11:02 AM
लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांच्या धारदार माऱ्यासमोर ज्यो रुटची इंग्लंड टीम ढेपाळली. विजयासाठी 272 धावांचं लक्ष्य घेऊन पाचव्या दिवशी मैदानात उतरलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 120 धावांत गुंडाळलं. त्यामुळे भारताने हा रोमांचक सामना 151 धावांनी जिंकला.  या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

1 / 8
भारताने पाचव्या दिवशी इंग्लंडसमोर 60 षटकात 272 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताचा वेगवान तोफखाना मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी अक्षरश: आग ओकणारी गोलंदाजी केली. इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी असं काही बांधून ठेवलं की त्यांना 1-1 धाव करणंही मोठं कठीण झालं.

2 / 8
मोहम्मद सिराज या सामन्यात भलत्याच फॉर्ममध्ये दिसला. इंग्लिश खेळाडूंना टशन देत, खुन्नस देत अक्षरश: तो मैदानातच भिडला. बुमराह, इशांत, शमी आणि सिराजच्या बाऊन्सर्सनी इंग्लंड फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. सिराजने 32 धावात 4 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने 33 धावा देत 3 फलंदाजांना तंबूत धाडलं. इशांत शर्माने 13 धावात 2 तर मोहम्मद शमीने 13 धावात 1 विकेट घेत इंग्लंडला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.

3 / 8
लॉर्ड्स कसोटीत भारताच्या वेगवान गोलंदाजांचं कौतुक होत आहे. मोहम्मद सिराजने दोन डावात चार-चार विकेट घेत एकूण 8 विकेट्स आपल्या नावे केल्या. याशिवाय ईशांत शर्माने पहिल्या सामन्यात 3 आणि दुसऱ्या डावात 2 अशा पाच विकेट्स घेतल्या. भारताचा यॉर्कर किंग बुमराहला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही, मात्र दुसऱ्या डावात महत्त्वाच्या तीन विकेट त्याने घेतल्या. मोहम्मद शमीने पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.

4 / 8
दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. भारताचं नेतृत्त्व करत असलेल्या विराट कोहलीचा आक्रमकपणा तर सर्वांना माहिती आहे. पण या सामन्यात मोहम्मद सिराज ज्या प्रकारे भिडला, ते पाहता इंग्लंड टीम त्याला नेहमी लक्षात ठेवेल हे निश्चित

5 / 8
या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी कोसळत होती. त्यावेळी विराट कोहली जोस बटलरला बोट करुन काहीतरी समजावताना दिसला. विराट कोहली भराभर बोलत होता तर बटलर गप्प राहून ऐकून घेत होता.  मोहम्मद सिराजने गोलंदाजी करताना इंग्लंडच्या ओली रॉबिन्सनला डिवचलं होतं. त्यावेळी मैदानात थोडी बाचाबाची झाली. त्यावरुनच कोहली बटलरला समजावत असल्याचं दिसलं.

6 / 8
रॉबिन्सन जेव्हा गोलंदाजी करत होता, त्यावेळी तो भारतीय फलंदाजांवर टिपण्या करत होता. मात्र रॉबिन्सन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मोहम्मद सिराजने 'ईंट का जबाब पत्थर से' दिला. सिराज हा रॉबिन्सला असा काही भिडला की, काही क्षण असं वाटलं दोघे एकमेकांचे कॉलर पकडतात की काय.

7 / 8
 लॉर्ड्सच्या मैदानात भारताच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी तर केलीच, पण त्यांनी फलंदाजीतही दमदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने 70 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. तर जसप्रीतम बुमराहने तळाला येऊन उत्तम साथ दिली.  बुमराहने 64 चेंडूत 34 धावा केल्या. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचली. शमी आणि बुमराह मैदानात आले तेव्हा भारताची धावसंख्या 8 बाद 209 अशी होती. त्यावेळी भारताकडे 182 धावांची आघाडी होती. या दोघांनी 89 धावांची अभेद्य भागादारी रचल्यामुळे इंग्लंडसमोर 272 धावांचं आव्हान उभं राहिलं.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.