THE HUNDRED मध्ये धमाल करण्यास भारताच्या या 5 रणरागिणी सज्ज, इंग्लंडमध्ये जलवा दाखवणार!

पाच भारतीय महिला क्रिकेटर्स इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा नवीन प्रयोग 'द हंड्रेड' मालिकेत सहभागी होणार आहेत. या पाच खेळाडूंना बीसीसीआयने या मालिकेत खेळण्याची परवानगी दिली आहे. (Indian team Women player in hundred England)

1/5
पाच भारतीय महिला क्रिकेटर्स इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा नवीन प्रयोग 'द हंड्रेड' मालिकेत सहभागी होणार आहेत. या पाच खेळाडूंना बीसीसीआयने या मालिकेत खेळण्याची परवानगी दिली आहे.

2/5
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धेचं आयोजन मागील वर्षी होऊ शकलं नाही. आता ही स्पर्धा 21 जुलैपासून सुरू होत आहे. ज्यात पुरुष आणि महिलांचं टूर्नामेंट एकाच वेळी सुरु राहील. या दोन्ही स्पर्धांमध्ये 8-8 संघ असतील. या  फॉरमॅटमध्ये केवळ 100-100 बॉल खेळले जाणार आहे. त्यामुळे अधिक रोमांच असेल.

3/5
त्याचबरोबर जगातील पहिल्या क्रमांकाची टी -20 खेळाडू शेफाली वर्मा बर्मिंघम फिनिक्सकडून खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंडच्या सोफी डेविनच्या बदली म्हणून तिचा समावेश करण्यात आला आहे. तर युवा स्टार जेमिमा रॉड्रिग्स नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळेल.

4/5
भारतीय टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळेल. दुसरीकडे स्टार सलामीवीर स्मृती मंधाना सदर्न ब्रेव्ह येथे इंग्लंडची अनुभवी फलंदाज डॅनी व्याटच्या साथीने डावाची सुरुवात करेल. अष्टपैलू दीप्ती शर्मा लंडन स्पिरीटकडून खेळेल.

5/5
यापूर्वी रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा इंग्लंडच्या टी -20 लीग किआ सुपर लीगमध्ये खेळल्या आहेत. हंड्रेडच्या आधी भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 16 जून ते 15 जुलै दरम्यान 1 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी -20 सामने खेळणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI